कामगारांना न्याय देण्यासाठी समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेची स्थापना.

0
139

 उरण दि 1(विठ्ठल ममताबादे)कामगारांना न्याय मिळावे, कामगार क्षेत्रातील विविध अन्यायाला वाचा फोडावी. कामगारावरील अन्याय दूर करता यावेत यासाठी कामगारांच्या हितासाठी द ट्रेड यूनियन ऍक्ट 1926 अंतर्गत शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख अतुल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेचे मुख्य कार्यालय भेंडखळ, ता उरण जि रायगड येथे आहे.अध्यक्ष अतुल परशुराम भगत, उपाध्यक्ष-रुपेश पाटील, चिटणीस-अनिल भोईर, सरचिटणीस दिपेश वास्कर , खजिनदार विकास घरत, सहखजिनदार – नैनेश म्हात्रे सदस्य अंकित पाटील, राज वास्कर ,आशीर्वाद पाटिल आदी पदाधिकारी सदस्य यांच्या माध्यमातून कामगार क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळणार आहे. येत्या काही दिवसात रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या संघटनेचे शाखा स्थापन करण्यात येणार आहेत. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अतुल भगत यांनी दिली. संघटना जॉईन करण्यासाठी, संघटनेत सहभागी होण्यासाठी संघटनेचे चिटणीस अनिल भोईर फोन नंबर -8652503043 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here