उरण दि 31(विठ्ठल ममताबादे ) रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनची गुरुवार दि. 27 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 रोजी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . पनवेल तालुक्यातील मानघर येथील अक्षरधाम फार्महाऊस येथील या आयोजित कार्यक्रमासाठी इराण चे मुख्य प्रशिक्षक डॉ महादी फारूक यांनी खास भेट दिली. या आयोजित किक बॉक्सिंग स्पोर्ट्स प्रशिक्षण कार्यशाळेस उरण, पनवेल तसेच पेण तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. इराणचे मुख्य प्रशिक्षक डॉ महादी फारूक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी हितगुज साधून कार्यशाळेत त्यांच्या अनुभवातून उपस्थित 80 हुन अधिक विद्यार्थ्यांना किक बॉक्सिंगचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले.या कार्यशाळेसाठी सुधाकर घारे अध्यक्ष, मधुकर घारे कार्याध्यक्ष,जीवन धाकवलं हेडकोच, भगवान शिंदे कर्जत तालुका अध्यक्ष, महेश मिसाल सभासद, तालुका कमिटी सदस्य सिहान राजु कोळी ,सेंसाई डॉ कृष्णा पाटील, सेन्सई आनंद खारकर, सेन्सई महेंद्र कोळी, सेन्सई राकेश म्हात्रे, राजेश कोळी, परेश पावसकर, गोपाळ म्हात्रे,अनिश पाटील, भूषण म्हात्रे, अमिता घरत, अमिषाघरत शुभम ठाकूर रोहित घरत,मानसी ठाकूर सुजित पाटील,सुलभा कोळी, कक्षा म्हात्रे, दिपीप शेठ घरत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Home महाराष्ट्र किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड प्रशिक्षण कार्यशाळेला इराण प्रशिक्षक डॉ महादी फारूक...