कराडी समाजाच्या गोमेश्वर मंदिरासाठी 25000 ची आर्थिक मदत.
उरण दि. 8 (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील पागोटे गावातील सामाजिक कार्यकर्ते कुणाल अरुण पाटील हे विविध सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहतात. वर्षभरात सामाजिक बांधिलकी जपत ते विविध उपक्रम साजरा करतात. पागोटे गावात कराड़ी समाजाच्या गोमेश्वर मंदिरासाठी सामाजिक कार्यकर्ते कुणाल पाटील यांनी 25000 रुपये देणगी दिली आहे. यावेळी कराडी समाज पागोटेचे अध्यक्ष नरेश भोईर, उपाध्यक्ष माणिक पाटील, सेक्रेटरी सुजीत पाटील,खजिनदार नरेश पाटील, महेश पाटील, धीरज पाटील, विनय पाटील, वसंत भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या कुणाल पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत कराडी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कुणाल पाटील यांचे आभार मानले आहेत.