
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज गुजरात निवडणुकीसाठीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
गुजरातची दोन टप्प्यात निवडणूक होणार असून नोटिफिकेशनची तारीख- 5 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबर असेल.
मतदानाची तारीख- 1 आणि 5 डिसेंबर 2022 आहे.
8 डिसेंबरला मतमोजणी होईल. याच दिवशी हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचीही मतमोजणी होईल.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुजरात निवडणुकांची घोषणा केली. 182 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
निवडणुकीसाठी एकूण 51000 मतदान केंद्रं यासाठी उभारण्यात आली आहेत. त्यातील 34000 केंद्रं ग्रामीण भागात आहेत.
तरुण मतदारांसाठी कमी वयाचे कर्मचारी तैनात असणार आहेत. तसंच या निवडणुकीसाठी अतिरिक्त निरीक्षक नेमण्यात येणार आहे.
तृतीयपंथी समाजातील मतदारांना मतदान करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याचं राजीव कुमार यांनी सांगितलं. यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचं ते पुढे म्हणाले.
गुजरात मध्ये सध्या 4 कोटी 90 लाथ 89 हजार 765 मतदार आहेत. त्यात 2 कोटी 53 लाख 36 हजार 610 पुरुष आहेत तर महिलांची संख्या 2 कोटी 37 लाख 51 हजार 738 आहे.
नवीन मतदारांची संख्या 11 लाख 62 हजार आहे. अहमदाबादमध्ये सगळ्यात जास्त मतदार आहेत कर डांग भागात सर्वात कमी मतदार आहेत.
2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने 99 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेस ने 77 जागा जिंकव्या होत्या. एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली आहे.
ही निवडणूक दोन टप्प्यात झाली होती.