टेम्पो ची स्कुटीला धडक. अपघातात स्कुटी चालकाचा मृत्यू, दोन जखमी

0

 

उरण दि ९( विठ्ठल ममताबादे ) : गव्हाण फाटा ते चिरनेर रस्त्यावरुन बाँयलर कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोची स्कुटी चालकाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात स्कुटी चालक वैभव म्हात्रे ( रा.हाशिवरे – अलिबाग)याचा जागीच मृत्यू झाला आहे.तर टेम्पो चालक व त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे.सदर अपघात हा रविवारी ( दि  ९ )सकाळी ठिक ६ -१५ च्या सुमारास टाकी गावच्या बस स्थानका जवळ घडली आहे.

    गव्हाण फाटा ते चिरनेर रस्त्यावरुन खारपाडा  दिशेने बाँयलर कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोनी चिरनेरच्या दिशेने येणाऱ्या स्कुटी चालकाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कुटी चालक वैभव म्हात्रे ( रा.हाशिवरे -अलिबाग) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.तर सदर टेम्पो चालक सलिम हुसेन व त्यांचा साथीदार अब्दुल शेख हे गंभीर जखमी झाले आहेत.सदर अपघात हा रविवारी ( दि९) सकाळी ठिक ६-१५ च्या सुमारास घडला आहे.

   या अपघाताची माहिती तिथे उपस्थित असलेले पुनाडे गावचे रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पाटील उरण पोलिसांना कळवली. माहिती मिळताच पोलिसांनी सदर अपघात ग्रस्तांना या परिसरातील नागरिकांच्या मदतीने उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.या अपघाताची माहिती उरण वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी आपल्या कर्मचारी वर्गाला पाठवून वाहतूक कोंडी ची समस्या उद्भवणार नाही याची खबरदारी घेतली आहे.सदर अपघाता संदर्भात उरण पोलीस अधिक तपास करत आहेत. पुनाडे गावातील देवेंद्र यांनी प्रसंगावधान राखत ही माहिती त्यांच्या कुटुंबियांना व पोलिसांना कळविली.

सदर घटना स्थळी उपस्थित असलेले देवेंद्र पाटील यांनी सांगितले की हि घटना सकाळी साधारण ता ६.४५ वाजता चिरनेर टाकी गाव येथे घडली आहे.वैभव म्हात्रे हे मुळ हाशिवरे अलिबाग येथील रहिवासी असुन ते वास्तव्यास उलवानोड येथे आहेत.ते इस्पात कंपनी वडखळ येथे कामाला असुन ते आपली नाईट ड्युटी संपवुन घरी येत असताना त्यांना चिरनेर टाकी गाव येथे विंधने गावाकडु येणाऱ्या MH.06 BW 2646 ह्या कोंबड्यांची भरलेल्या पिक्अप टेम्पो ने धडक दिली.तेव्हा मी माझी नाईट ड्युटी संपवुन घरी येतात मला हा प्रकार दिसल्यामुळे मी तेथे जाऊन थांबलो तो पर्यंत टेंपोचलक आणि दुसरा एक इसम तेथुन पळून जाण्याच्या तयारीत असताना मी एकाला पकडलं आणि दुसर्याच्या हाताला मार लागल्याने तो तीथेच थांबला होता.तोपर्यत वैभव म्हात्रे ह्यांची प्राणज्योत मालवली होती.मला ह्या मृत व्यक्तीची ओळख पटवने खुप कठीण झालं.होत आणि सर्व जण बघ्यांची भुमीका घेत होते.आणि फोटो काढण्यात मग्न होते.मग मी ऊरण पोलिस स्टेशनमधील मध्ये पोलीस अधिकारी पवार ह्यांना घटनेची माहिती दिली.मला माहीत होतं की पोलिस यायला खूप उशीर लागेल मग मी त्यांच्या चेहऱ्यावर चा रक्ताने माखलेले शर्ट बाजूला केला तरी पण ओळख पटतनव्हती नंतर त्याच्या खिशात हात घालून त्याचा मोबाईल फोन बाहेर काढला आणि त्यातला एक नंबर डायल केला.देवकृपेने तो नंबर त्यांच्या पत्नी ला लागला आणि ह्या सर्व घटनेची माहिती त्यांना दिली.त्या सर्व नातेवाईकांनी माझे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here