देवळाली प्रवरा बेवारस मृतदेह सापडला, राहुरीच्या पोलिस उपनिरीक्षकाची व पञकारांची खडाजंगी 

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी

देवळाली प्रवरा येथिल साई मंदिराच्या पाठीमागिल चरात एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह सापडला असुन त्याचे वय साधारण 35 ते 40 असावे असा अंदाज आहे.देवळाली प्रवरा पोलिस चौकीत पोलिस थांबत नसल्याबाबत पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा यांना पञकारांनी विचारले असता पाच पोलिस चौकीसाठी दिलेले आहेत. आज पासुन त्यांची हजेरी पञकारांनी घ्यावी पोलिस चौकीवर उशिरा येवून पञकारावर फौजदारी करुन खडाजंगी झाली. 

             देवळाली प्रवरा येथिल साई मंदिराच्या पाठीमागिल चरात पालथ्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह सकाळी 10 येथिल मंदिराचे पुजारी बालकदास उदासिंग या पुजाऱ्याने लघुशंकेसाठी मंदिराच्या मागिल बाजुस गेले असता त्यांना पालथ्या अवस्थेत मृतदेह दिसला. या पुजाऱ्याने देवराम विठ्ठल कडू यांना प्रथम मृतदेहाची माहिती दिली. देवराम कडू यांनी पोलिस चौकीवर माहिती देण्यासाठी गेले असता पोलिस चौकीवर एकही पोलिस नसल्यामुळे पोलिस चौकी बंद होती.भ्रमणभाषवरुन पो.हे.काँ. प्रभाकर शिरसाठ यांना माहिती दिली. ते सुमारे दोन तासा नंतर घटनास्थळी पोहचले.उपस्थित नागरीकाने पोलिस उपनिरीक्षक नाऱ्हेडा यांना माहिती दिली. मृतदेह चरातून वर काढून रुग्णवाहीनीत ठेवल्यानंतर मृतदेहाचा पंचनामा पोलिस अधिकारी यांच्या समक्ष करण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी यापुर्वीच आदेश दिलेले असल्याने. यथावकाश पोलिस उपनिरीक्षक नाऱ्हेडा आले. पोलिस चौकीत बसुन मृतदेहाचा पंचनामा भरण्यात आला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक नाऱ्हेडा यांना या चौकीवर पोलिस नसतात या बाबत विचारले असता पोलिस चौकीवर का नाही याचे उत्तर देण्या ऐवजी पञकारांनीच पोलिसांची हजेरी घ्यावी म्हणजे पोलिस उपस्थित राहतील असे सांगून तुम्ही मला विचारणारे कोण असा सवाल उपस्थित केल्याने पोलिस उपनिरीक्षक नाऱ्हेडा व पञकार यांच्यात खडाजंगी झाली. 

                मृतदेहाच्या अंगावर काळपट रंगाचा शर्ट, काळसर रंगाची पँट घातलेली आहे. सदर इसम नशेत असताना प्रातविधीसाठी गेला असताना. चराच्या कडेला प्रातविधी करत असताना तोल जावून चरात पडला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या मृतदेहाची उंची साधारण पाच फुट असावी.घटनास्थळी पो.हे.काँ.प्रभाकर शिरसाठ, होमगार्ड अमोल पवार यांनी भेट दिली. मृतदेह काढण्यासाठी नगरपालिकेचे  सोमनाथ सुर्यवंशी,भाऊसाहे बर्डे,मुकेश डांगे,केतन शेरगिल आदी कर्मचाऱ्यांनी मदत केली.

         देवळाली प्रवरा पोलिस चौकी कायमच बंद असते.या चौकीवर पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती असतानाही एक हि पोलिस कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने नागरीकांनी संताप व्यक्त करुन असुन अडचण, नसुन खोळंबा अशी अवस्था पोलिस चौकीची असल्याचे नागरिकांनी बोलुन दाखवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here