शाहूपुरी, संदिप निलंगे : सर्वाेच्च न्यायलयाचा ध्वनि प्रदूषणाचा आदेश धुडकावून विना परवाना मोठ्या आवाजात स्पीकर लावल्या प्रकरणी सातारा जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहूपुरी पोलिसांनी सदरबझार येथील श्रीमंत युवा गणेश उत्सव मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षासह चालक, साऊंड सिस्टीम चालकासह 5 जणांवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत भगवान मोहिते (वय- 31, रा. सदरबझार), उपाध्यक्ष चेतन मोहन लंबाते (वय- 34, रा. सदरबझार), साऊंड सिस्टिम मालक अन्सार शेख (रा. शनिवार पेठ), लाईट व जनरेटर मालक रजनीकांत चंद्रकांत नागे (रा. रविवार पेठ), चालक गणेश सुरेश जगदाळे (रा.मल्हार पेठ, सर्व सातारा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करून साहित्य शाहुपुरी पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, दि. 21 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गणेश कॉलनी सदरबझार येथे ही कारवाई करण्यात आली. या दिवशी गणेशोत्सव 2022 गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीत ओमनी कार होती. त्यावर कर्णे, स्पीकर कर्णकर्कश आवाजात सिस्टीम होती. यामुळे रहिवासी लोकांना त्याचा त्रास झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता संबंधित मंडळाने पालिका तसेच पोलिसांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले.