पेरू पिकाच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या बैठकीत शास्त्रज्ञांकडून शेतकर्‍यांना मार्गदर्शन

0

राहुरी विद्यापीठ, दि. 29 ऑगस्ट, 2022
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील आखिल भारतीय समन्वित फळपिके संशोधन
प्रकल्पाच्या पेरू पिकावरील शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची बैठक राहाता तालुक्यातील एकरुखे येथे
संपन्न झाली. प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सतीश जाधव यांनी बैठकीच्या सुरुवातीला प्रास्ताविक
करताना पेरू पिकासाठी शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची स्थापना करण्याचा उद्देश व त्याच्या
उपयोगाविषयी स्पष्टीकरण केले. कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वरचे शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम हेंद्रे यांनी
पेरू लागवडीविषयी माहिती देतांना सध्या पेरू पिकावर स्केल किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे तसेच
फळमाशी, मिलीबग, सुत्रकृमी व देवी रोगाची समस्या शेतकर्‍यांना भेडसावत असल्याचे
सांगितले. डॉ. विकास भालेराव आणि डॉ. रणजीत कडू यांनी या किडरोग समस्यांवर मार्गदर्शन
करताना एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनावर माहीती देवून त्यामध्ये मशागती, भौतिक,
जैविक व गरज पडल्यास रासायनिक पध्दतीचा वापर तसेच मित्र किडींचे व परागीभवन
करणार्‍या मधमाशीचे संवर्धन करण्याविषयी सविस्तर माहिती दिली.
या बैठकीसाठी ताकुका कृषि आधिकारी श्री. शिंदे तसेच एकरुखे व राहाता तालुक्यातील
पेरू उत्पादक शेतकरी उपस्थित होते. डॉ. कडू यांनी आभार मानले. ही बैठक यशस्वी होण्यासाठी
शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष संदीप टिळेकर यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here