प्रसारमाध्यमांमुळे रिपब्लिकन सेनेच्या आमरण उपोषणणास यश आल्याने समाप्तीची घोषणा 

0

सातारा : गमेवाडी ता. कराड येथील सरपंच सविता रामचंद्र ढवळे व सदस्य यांना जातीवादी मानसिकतेतुन जाणीवपूर्वक पद रद्द करण्याकरीता राजकीय षडयंत्र रचणाऱ्या ग्रामसेवक प्रशांत सदाशिव कारंडे, उपसरपंच वसंत पांडुरंग जाधव यांना निलंबित करुन कठोर कारवाई करावी. अशी मागणी करूनही न्याय मिळाला नव्हता.तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन सेनेतर्फे आमरण उपोषण सुरू केले होते.त्याचे वृत्तांकन प्रसारमाध्यमांद्वारे सर्वत्र जाहीर होताच.संबंधित अधिकारी यांनी भेट घेऊन जिल्हा कार्यालयात ठोस भूमिका घेतल्याने आंदोलन थांबविण्यात आले आहे.

     मागासवर्गीय प्रवर्गातून सरपंच म्हणुन सविता ढवळे व त्यांची आई सौ. बाळकाबाई ढवळे या गावातील एकाच कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीत बिनविरोध निवडुन आल्या होत्या.गावात इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे एकच कुटुंब वास्तव्यास आहे. या गावातील आलेल्या इतर सदस्यांनी वय वर्षे ७५ असणाऱ्या सौ. बाळकाबाई ढवळे यांना सरपंच बनविण्याचा कुटील डाव आखला होता. परंतु त्यांचे वय पाहता त्यांची मुलगी सविता ढवळे यांना प्रशासनाने अनुमोदक आई तर सुचक स्वतः प्रशासन होऊन सरपंचपदी निवड करण्यात आली. याचाच मनात राग धरुन सर्व सदस्य उपसरपंच वसंत पांडुरंग जाधव व ग्रामसेवक प्रशांत कारंडे यांनी जाणीवपूर्वक जातीय द्वेषातुन ओ.बी.सी. महिला सरपंच असल्याने जाणीवपूर्वक राजकीय डावपेच टाकून त्रास देण्याचे काम चालु केले आहे. यामध्ये सदर कारभार मनमानी करुन न झालेल्या कामाचे चेक पुर्ण झाले असल्याचे दाखवत गैरव्यवहार करीत आहेत. मुंबई ग्रामपंचायत अधिनियमांचे उल्लंघन करुन सरपंच सविता ढवळे यांच्या परस्पर बेकायदेशीर व्यवहार व कारभार चालवत आहेत. तसेच त्या कुटुंबीयांना मंजुर झालेले घरकुल काम चालु असतानाही अडथळे अणुन ते बंद पाडण्यात आले आहे.त्यांचे वडिल ९२ वर्षाचे रामचंद्र तुकाराम ढवळे यांना कारण नसताना खोटे नाट्य राजकीय हेतुने तक्रारी करुन कोर्टाच्या पायऱ्या झिजविण्यास भाग पाडले आहे. याचा जाब विचारता अपमानीत करुन जाती वाचक शिवीगाळ, दमदाटी, अंगावर येणे असे प्रकार सातत्याने ग्रामसेवक, उपसरपंच करत असुन हे मानवतेला काळिंबा फासणारे कृत्य चालु आहे. अश्या जातीवादी मानसिकतेत काम करणाऱ्या ग्रामसेवक व उपसरपंच यांना निलंबित करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.अशा आशयाची मागणी पालकमंत्री यांच्यासह मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, खा. श्रीनिवास पाटील, उप मुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) आदींच्याकडे यापूर्वीच निवेदनाद्वारे केलेल्या आहेत.

    आमरण उपोषण दुसऱ्या दिवसाचे चालू असताना कराडच्या गटविकासाधिकारी मीनाताई साळुंखे यांनी भेट देऊन प्रशासकीय मार्गदर्शन केले. ज्येष्ट पत्रकार अनिल वीर यांनीच प्रामुख्याने दैनिकांतून प्रकाशित केलेल्या वृत्तावरूनच प्रशासनाची धावपळ झाली.त्यामुळे सरपंच यांच्या सर्व मागणीची पूर्तता केली जाईल.असे ठोस आश्वासन मिळाल्याने अनिल वीर यांच्याच प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली आंदोलनाचा समारोप झाल्याचे आंदोलन कर्त्यांनी जाहीर केले आहे. सामाजिक कार्यकर्त्या पूनम कांबळे (पाचगणी),राष्ट्रोत्सव समितीचे ऍड.विलास वहागावकर कृष्णा गव्हाळे,साहित्यिक प्रकाश काशीळकर व दिलीप सावंत, आयटक अध्यक्ष पठाण,संपादक सत्यवान शेडगे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते यांनी भेट देऊन जाहीर पाठींबा दिला होता.

फोटो : ढवळे परिवारासह रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here