महिलेस मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी मोरा पोलीस ठाण्यात हर्ष कोळी, महेश कोळी यांच्यावर गुन्हा दाखल.

0

उरण दि 16(विठ्ठल ममताबादे )

मंदा परशुराम कोळी, वय 50, राहणार -भवरा, तालुका उरण, जिल्हा रायगड ही महिला मासळी साफ करण्याचे काम करते.त्यापासून तीला रोजी रोटी मिळते.बुधवार दिनांक 5/10/2022 रोजी नवरात्री विसर्जनचे सकाळी मंदा कोळी यांचा मुलगा मिलिंद परशुराम कोळी याच्या अंगावर काही मुलांनी बियरच्या बाटल्या फेकून मारल्या.व मंदा कोळी या नवरात्र विसर्जन करण्याकरिता रात्री गेली असता मंदा यांच्या हातांत मुलाची मुलगी (नात) होती. तिची तब्येत ठिक नसल्यामुळे ती जेट्टीवर बसले होती . त्याचवेळी गावातील  मुलांनी मंदा कोळी यांना शिवीगाळी केली व मंदा कोळी यांच्या अंगावर हात टाकून तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. हर्ष महेश कोळी , महेश जगन कोळी , रा. मोरा, दत्त मंदिर जवळ, ता. उरण, जि. रायगड असे शिवीगाळ करण्याऱ्यांची नावे असून महेश जगन कोळी यांनी मंदा कोळीला धमकी दिली की मुलाचे पोलिस मध्ये नाव सांगू नकोस नाहीतर माझ्या गाडीची चावी तुझ्या साडीच्या आतमध्ये टाकून तुझी आतडी बाहेर काढीन. मंदा कोळीला  मच्छी साफ करण्याकरिता रात्री 2  वा च्या सुमारास जावे लागते. मंदा कोळीचा मुलगा मिलिंद परशुराम कोळी हा मच्छी मारण्याकरिता (डोलीवर) जात असतो. तो दुस-याच्या बोटीवर खलाशी म्हणून काम करित असतो. तेव्हा महेश जगन कोळी त्याला जिवेठार मारण्याची धमकी देत असतो. तसेच मंदा कोळी यांची सुन धनश्री मिलिंद कोळी हिला पण महेश जगन कोळीने  धमकी दिली की मी तुझ्या पतीला व सासुला मारहाण केली. आता तुला पण ठार मारणार. तसेच मंदा कोळी यांच्या सुनेची बहिण मानसी सुभाष कोळी हिला सुध्दा हर्ष महेश कोळी याने धमकी दिली की तु त्यांची साक्षीदार आहेस त्यांचे बाजुने बोलतेस ना आम्ही तुला पण नाही सोडणार तुला पण मारणार. अश्या प्रकारे मंदा कोळी व त्यांच्या कुटुंबाला मोरा येथे राहणारे हर्ष महेश कोळी, महेश जगन कोळी यांच्या पासून जीवाला धोका असल्याने मंदा परशुराम कोळी यांनी मोरा पोलीस स्टेशन गाठले व घडलेली सर्व हकीगत त्यांना सांगितली. शिवीगाळ, धमकी व मारहाण केल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 323,504 अन्वये हर्ष महेश कोळी, महेश जगन कोळी यांच्या विरोधात मोरा पोलीस ठाण्या मार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मी मोरा पोलिस स्टेशन येथे गेली असता तेथे एन सी दाखल झाले. मात्र मला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्यांना अटक झाली नाही.तरी त्या मुलांवर फौजदारी व न्यायालयीन गुन्हा दाखल करण्यात यावा यापुढे माझ्यावर कोणतेही संकट आल्यास मी स्वतःचे आत्मदहन करेन याची कृपया नोंद घेण्यात यावी व त्या मुलांवर कडक शासन करण्यात यावे अशी तक्रार सदर पीडित महिला मंदा परशुराम कोळी यांनी पोलीस निरीक्षक सायबर क्राईम, सिबिडी बेलापूर, पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई येथे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here