संगमनेर : आई बरोबर कपडे धुण्यासाठी गेलेल्या साईल संतोष कातोरे (वय १३,रा. नांदुरी दुमाला) या विद्यार्थ्याचा म्हाळुंगी नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. रविवारी सकाळी १० वाजता गुंजाळवाडी शिवारात हि घटना घडली.
या विद्यार्थ्याला प्रसिद्ध जलतरणपटू अॅड.सदाशिवराव थोरात व काही तरुणांनी पाण्याबाहेर काढले. सध्या म्हाळुंगी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने दिवाळी निमित्त महिलांनी कपडे व भांडे धुण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. महिलांनी नदी पात्राजवळ गर्दी करू नये, असे आवाहन नागरिकांनी केले आहे. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरून शहर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान ऐैन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या दुःखद घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.