युवकांनी ज्येष्टांचा आदर राखून मार्गक्रमण करावे : भागवत भोसले

0

सातारा :  युवकांनी महापुरुषांबरोबरच ज्येष्टांचा आदर राखला पाहिजे.त्यांच्या विचारानुसार वाटचाल केली तर अधिकची प्रगती करता येईल. तरच प्रभावी असे संघटन निर्माण होवुन इप्सित यश प्राप्त करता येईल. असे आवाहन केंद्रीय शिक्षक भागवत भोसले व अनिल वीर यांनी केले.

        नूने,ता.सातारा येथील ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते बबन बाळकु मोरे (बापू) यांच्या पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तेव्हा आदरांजलीपर भोसले-वीर मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सौ.जयश्री मोरे होत्या.

    बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर म्हणाले, “आजचे युग धावपळीचे असुन युवकांनी कुठेही धावता कामा नये.त्यांना योग्य दिशा देण्यासाठी अनुभवी अशा ज्येष्टांचे मार्गदर्शन गरजेचे आहे.त्यामुळे आपले आई-वडील, गुरू,महामानव व समाजातील थोर व्यक्तींचा सल्ला घेऊनच वाटचाल करावी.बाबासाहेब यांनी दिलेल्या बुद्ध विचारानुसारच तंतोतंत वाटचाल करावी. मनुष्य म्हटला की तो चुकतोच. तेव्हा पुनःपुन्हा चुका न करता परिवर्तन केले पाहिजे.धम्मात लवचिकता असल्याने मानवास सुधारण्यासाठी वाव आहे. त्रिशरण,पंचशील,अष्टांगमार्ग व २२ प्रतिज्ञेचे पालन करायलाच हवे.परिवर्तन हा निसर्गाचा नियम असल्याने मानवाने बदल करायला काहीही हरकत नाही. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असला तरी धम्म म्हणुन १०० टक्के पालन केलेच पाहिजे. याशिवाय,युवकांनी नोकरी/व्यवसाय करूनच समाजकारण/राजकारण करावे.समाज आपल्याकडे पाहत असल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. थोडक्यात, मागतकऱ्याची भूमिका असता कामा नये.तरच आपण सक्षपणे काम करण्यास पात्र ठरू.”

            भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक विधिकार भागवत भोसले म्हणाले, “प्रत्येकांनी नातेसंबंध जोपासली पाहिजेत. डॉ.आंबेडकांनी अप्रतिम अशी बुद्ध भेट दिली आहे.बुद्धाला शरण गेले तरच मानवी जीवन साफल्य झाल्याचा स्वानंद मिळेल.मनातील दुर्गुण दूर करण्यासाठी मनावर ताबा असला पाहिजे. मानवाचे चालणे,बोलणे व पहाणे यांवरही त्याचे मूल्ये ठरविले जाते. मैत्रिभावना वाढविण्यासाठी कोणताही भेद करता कामा नये.” 

     यावेळी  सरपंच जयश्री संतोष मोरे, सुनील मोरे,अमोल मोरे, जयसिंग मस्के (कळंबे),नंदकुमार काळे (पाटखळ) संतोष मोरे, दिलिप सावंत आदींनी मनोगत व्यक्त केली.सदरच्या कार्यक्रमास निवास कंठे, गिरीश खरात, प्रकाश म्हस्के,पीएसआय श्रीकांत मोरे, राहुल मोरे, हेमंत मोरे ,मुकुंद मोरे, मिलींद मोरे, मंथन मोरे,नरेंद्र मोरे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते,उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.

फोटो : अभिवादनप्रसंगी नंदकुमार काळे,भागवत भोसले व इतर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here