रोमहर्षक सामन्यात भारताचा पाकिस्तानवर शेवटच्या चेंडूवर विजय ! शेवटच्या षटकात फिरला सामना, विराटची धडाकेबाज खेळी

0

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील बहुप्रतिक्षित भारत पाकिस्तान सामना अपेक्षितपणे रंगतदार बनला.

पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत 159 धावांचं आव्हान भारतासमोर ठेवलं होतं. हे आव्हान भारताला सहज पार करणं शक्य असतानाही, शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगतदार बनला. मात्र, अखेरीस भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला. विराट कोहलीने 82 धावांची धडाकेबाज खेळी केली,तर त्याला हार्दिक पंड्यानं 40 धावा करत संयमी साथ दिली. शेवटच्या षटकात दिनेश कार्तिक बाद झाल्यानंतर आर. अश्विन मैदानात आला आणि त्यानं विजयी फटका मारत भारताच्या विजयाची नोंद केली.

त्यापूर्वी भारताच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांची दाणादण उडाल्याचे चित्र दिसून आलं होतं. 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स देत 159 धावांपर्यंत पाकिस्तानला पोहोचता आलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here