विजबील वसूली कंञाटी वायरमनला जिवे मारण्याची धमकी.

0

देवळाली प्रवरा  /प्रतिनिधी

कंत्राटी कामगार वायरमन म्हणून  विजबील वसूलीचे काम करत असलेल्या गोरक्षनाथ अंत्रे या तरूणाला शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. राहुरी तालूक्यातील सोनगाव येथे दिनांक १० ऑक्टोबर रोजी ही घटना घडलीय. 

   गोरक्षनाथ विठ्ठल अंत्रे, वय २९ वर्षे, राहणार सोनगाव, ता. राहुरी. हा तरूण एम एस डि सी एल या कंपनीमध्ये खाजगी तत्वावर कंत्राटी कामगार वायरमन म्हणून तसेच लाईटबील वसूलीचे काम करतो. दिनांक १० ऑक्टोबर रोजी यातील आरोपी गोरक्षनाथ अंत्रे याला म्हणाले कि, मी लाईटबील भरत नाही, तूला काय करायचे ते करून घे. तूला पोलवर चढण्याच्या लायकीचा ठेवणार नाही. तूझे हातपाय तोडून टाकीन. असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिली.

        गोरक्षनाथ विठ्ठल अंत्रे याच्या फिर्यादीवरून आरोपी फरहान नूरमहम्मद इनामदार व रिजवान नूरमहम्मद इनामदार दोघे राहणार, सात्रळ, तालुका राहुरी. यांच्या विरोधात गुन्हा रजि. नं. २०२७/२०२२ भादंवि कलम ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 

        या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोमनाथ जायभाय हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here