श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात राजश्री शाहु महाराज जेष्ठ नागरीक मंचच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना वह्या वाटप संपन्न्

0

कोपरगाव-

श्रीमान गोकुळचंदजी विदयालय.कोपरगांव मध्ये राजश्री शाहु महाराज जेष्ठ नागरीक मंच. कोपरगावच्या वतीने शालेय गरीब-गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप केले असल्याची माहिती मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी दिली .

कोरोना कालावधी नंतर शाळा सुरु झाल्या परंतु  त्यांमध्ये बरेच कुटुंब आर्थिक संकटात सापडले व त्यामुळे या संकटात काही प्रमाणात गरजु विदयार्थीना मदत व्हावी म्हणुन विविध सामाजिक संस्थाच्या  मदतीने विदयालयातुन शालेय गणवेष,दप्तर तसेच वहीवाटपाचे  नियोजन करण्यात आले.त्याचाच एक भाग म्हणुन आज शालेय वह्या वाटप करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्त या उपक्रमात राजर्षी शाहू महाराज जेष्ठ नागरिक सेवा मंचचे अध्यक्ष मन्साराम पाटील,उपाध्यक्ष गणपतराव विधाटे,सचिव विजय राहतेकर यांचे सह सर्व सदस्य उपस्थित होते. अध्यक्ष मन्साराम पाटील यांनी विदयालयाला पुढील काळात अजुन भरीव मदत करु असे जाहीर करुन मात्र मुलांनी अभ्यासात कमी पडु नये असे सुचवले. 

या कार्यक्रमाचे प्रास्तविक  मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले. स्वागत कला शिक्षक ए.बी.अमृतकर यांनी केले.उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड यांनी आभार मानले तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पी.बी.जगताप यांनी मानले.या प्रसंगी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Attachments area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here