संगमनेर नगरपालिकेकडून दीपावली निमित्त एक कोटी रुपयांचे वाटप

0

संगमनेर : संगमनेर नगर परिषदेच्या वतीने दीपावली सणानिमित्त सेवारत असलेल्या व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विविध देय रकमेपोटी सुमारे एक कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा नगरपरिषदेचे प्रशासक डॉ. शशिकांत मंगरुळे व मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली.

        दीपावली सण उत्साहात व आनंदात साजरा करण्यासाठी नगर परिषदेचे प्रशासक डॉ. शशिकांत मंगरुळे व मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करतांना कायम सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे दीपावली सण अग्रीम तसेच कायम कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या फरकापोटी सुमारे एक कोटी रुपयाचे रकमेचे वाटप करण्यात आले . तसेच शासन निर्णयाप्रमाणे दीपावली सणानिमित्त माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन २२ तारखेपर्यंत करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली.शहरातील नागरिकांना नगरपरिषदेच्या वतीने मूलभूत सेवा पूरवितांना कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असून कुठल्याही वेळेचा विचार न करता सर्व कर्मचारी तत्पर सेवा देतात. त्यामुळे त्यांच्या प्रति सहानुभूती असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच अग्रक्रम दिला जातो. सर्वांचा दीपावली सण आनंदात व उत्साहात जावो अशी सदिच्छा व्यक्त करून दीपावली सणानिमित्त डॉ. शशिकांत मंगरुळे व मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.नगर परिषदेच्या कायम व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या एक कोटी रकमेमुळे प्रशासक डॉ. शशिकांत मंगरुळे व मुख्याधिकारी राहुल वाघ यांचे कर्मचाऱ्यांनी  अभिनंदन करून आभार मानले . कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी रक्कम प्रदान करण्यात यावी  यासाठी नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी सुनील गोरडे , कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ , लेखापाल अशोक गवारे, अंतर्गत लेखापरीक्षक साधना ढेपले , धनश्री पैठणकर आस्थापना विभागाचे शिरीष तिवारी , शांताराम अभंग, उदय पाटील तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here