सांस्कृतिक वारसा लाभलेले भेंडखळ मधील आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ.

0

उरण दि 1(विठ्ठल ममताबादे )दरवर्षीप्रमाणे यंदाही भेंडखळ येथील आदर्श सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे विविध मनोरंजनात्मक  कार्यक्रम घेण्यात आले असून मंडळाचे यंदाचे हे 19 वे वर्ष आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ भेंडखळ तर्फे दरवर्षी विविध सामाजिक, धार्मिक,शैक्षणिक तसेच समाज प्रबोधनात्मक असे अनेक कार्यक्रम उत्साहात पार पाडले जातात.अशा कार्यक्रमास सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहत असतात.दिनांक 30/9/2022 रोजी संगीत खुर्ची,हळदी कुंकू कार्यक्रम,01/10/2022 रोजी पोत्यात धावणे असे कार्यक्रम संपन्न झाले असून दि 2 ऑक्टोबर रोजी मेणबत्ती लावणे  हरिपाठ भजन,3 ऑक्टोबर रोजी चमचा गोटी,4 ऑक्टोबर रोजी होमहवन विधी,महाप्रसाद,फॅन्सी ड्रेस व गरबा रास (महिला गट,पुरुष गट, लहान गट)आदी स्पर्धाही घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष वैभव भगत यांनी दिली.आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ,भेंडखळने आपला सांस्कृतिक वारसा जपला असून देवीचे दर्शनासाठी तसेच विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी भाविक भक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.कार्याध्यक्ष अतुल भगत, अध्यक्ष वैभव भगत, उपाध्यक्ष राकेश भगत, सचिव – यतिश भगत, खजिनदार – जय भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमास जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here