सातारा येथील रयतच्या मुख्य कार्यालयासमोर बदलीग्रस्त शिक्षकांचे आंदोलन

0

सातारा/अनिल वीर : अन्यायग्रस्त झालेल्या बदलीमुळे त्रस्त झालेल्या राज्यातील शिक्षकांनी येथील रयत शिक्षण संस्थेसमोर आंदोलन छेडले.

    दि.३० व ३१/८/२०२२ या दरम्यान प्रशासकीय बदल्या अनेक कारणे देऊन केलेल्या आहेत.तेव्हा दोन दिवशीय आंदोलन सुरू केलेले आहे. विशेषतः  रिपोर्टेड बदली म्हणून दुषीत आहे.त्यामुळे मानसिक खच्चीकरण होत आहे. तेव्हा आमच्या निवेदनाद्वारे सखोल अभ्यास करून आमच्या परिवारासह नाहक सहन करावा लागत आहे.तेव्हा न्याय मिळावा. अशा आशयाच्या मागणी रयतच्या प्रशासनाकडे करण्यात आलेल्या आहेत.यावेळी एस.सी. पठाण, महावीर घुगे, प्रियांका भालेराव, सोमनाथ मरभळ, किशोर सोलाट, पंढरीनाथ घोडे,चंद्रकांत जोर्वेकर,राजू गावित, प्रशांत थावरे, बापूराव वैद्य आदी सुमारे ७५ शिक्षक – शिक्षिका उपस्थित होत्या.

फोटो : रयतच्या मुख्य कार्यालयासमोर आमदोलन छेडताना शिक्षक-शिक्षिका.(छाया – अनिल वीर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here