सातारा येथे व्ही.आर.थोरवडे यांचा अमृतमहोत्सवी जाहीर सत्कार

0

सातारा /अनिल वीर : भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष व्ही.आर. थोरवडे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त  अमृतमहोत्सवी जाहीर नागरी सत्कार येथील सुरभी मंगल कार्यालयात राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई यांच्या हस्ते करण्यात आला.

   सातारा तालुका भारतीय बौद्ध महासभेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमास अध्यक्ष आबासाहेब दणाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी गौरवशाली भाषणे केली. गेली २५ वर्षे धम्म कार्यात असणारे थोरवडेसाहेब यांचे असामान्य व्यक्तिमत्व ठरले आहे. निवृत्त असिस्टंट कमिशनर सेंट्रल एक्साइज, भारतीय बौद्ध महासभेचे माजी राष्ट्रीय सचिव व विद्यमान जिल्हाध्यक्ष व्ही.आर. थोरवडेसाहेब यांच्या प्रदीर्घ धम्म कार्याविषयी व त्यांच्या समाजसेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा भव्य असा सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदरच्या कार्यक्रमास माजी राष्ट्रीय सचिव एन.एम. आगाणे (काका) आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास धम्मबांधव उपासक – उपासिकांसह माने, चंद्रकांत खंडाईत,जिल्हा सरचिटणीस विद्याधर गायकवाड, जिल्हा कोषाध्यक्ष श्रीमंत घोरपडे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश बारसिंग,भानुदास सावंत, बाळासाहेब जगताप,बाळकृष्ण देसाई,यशवंत अडसुळे,भागवत भोसले,नंदकुमार काळे,प्रकाश तासगावकर,ऍड.विजयानंद कांबळे, विकास तोडकर,दिलीप फणसे,विजय गायकवाड, नंदकुमार भोळे,आबासाहेब भोळे,अनिल कांबळे, मिलिंदबापू कांबळे,विविध संघटनांचे प्रतिनिधी मान्यवर,पत्रकार, महासभेचे जिल्हा पदाधिकारी, तालुका व कार्यकारणी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

फोटो : व्ही.आर.थोरवडे या दाम्पत्यांचा सत्कार करताना जगदीश गवई शेजारी पदाधिकारी.(छाया-अनिल वीर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here