साताऱ्यात ऍड.प्रकाश आंबेडकर यांची वंचितची आढावा बैठक संपन्न

0

सातारा/अनिल वीर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरभी मंगल कार्यालयात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

   यावेळी जिल्ह्यातील संपूर्ण आढावा स्वतः ऍड.आंबेडकरांनी घेतला. गण, गट,तालुका व जिल्हा कार्यकारिणीची हजेरीही स्वतः त्यांनीच घेऊन अनुपस्थितीबद्धल विचारणा करण्यात आली.प्रत्यक्ष संबंधित पदाधिकारी यांना पुढे घेऊन विचारणा करण्यात आली. लवकरच वरिष्ठांकडे अभ्यासपूर्ण अहवाल पाठविण्याबाबत सूचना देण्यात आल्या.यावेळी जिल्हा व तालुका पदाधिकारी, कार्यकारिणी, महिला आघाडी, युवा आघाडी, कामगार कर्मचारी युनियन आदी सर्व विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई व भीमराव घोरपडे यांनी स्वागत केले.याकामी,जिल्हा महासचिव शरद गाडे व गणेश भिसे,उपाध्यक्ष संदीप कांबळे, संजय कर्पे, नगरसेवक तुषार बैले, कांबळे आदींनी अथक असे परिश्रम घेतले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष व्ही.आर.थोरवडे, महासचिव विद्याधर गायकवाड, विजय गायकवाड, तालुकाध्यक्ष आबा दणाने (सातारा) व मिलिंद कांबळे (पाटण),पी.डी. साबळे, सिद्धार्थ मडके,वंचितचे तालुकाध्यक्ष उत्तम भालेराव (महाबळेश्वर), बाळासाहेब जगताप(पाटण), प्रकाश सपकाळ(जावली) आदी पदाधिकारी व त्यांचे सहकारी, सनी तुपे,योगेश कांबळे, राजाराम कदम,संजय कदम, आनंदा गुजर, वैभव कदम,नितीन कदम,सचिन कदम,चित्राताई गायकवाड, सायली भोसले व त्यांच्या सहकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

फोटो : ऍड.प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करताना शेजारी पदाधिकारी. (छाया-अनिल वीर)

——————————––————–

चौकट : सभागृहात गर्दी झाल्याने बैठक व्यवस्था ढिसाळ झाली होती. मात्र,सर्व सूत्रे ऍड. आंबेडकर यांनीच घेतल्याने नियोजनावर ताबा राखता आला…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here