*सूर्यतेज संस्थेच्या दीपावली पाड्व्या निमित्त घर तेथे रांगोळी स्पर्धेने कोपरगावकराना नयनरम्य रांगोळ्यांचे प्रदर्शन…*

0

कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत अ.भा.मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखा,बाल रंगभूमी परिषद,अहमदनगर,फोटोग्राफर असोसिएशन,कलाध्यापक संघ यांचे सहभागातून आणि विसपुते सराफ, धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म,कापसे पैठणी, पुष्पांजली शाॅपी, अग्रवाल चहा, पांडे स्विटस्, सुशांत आर्टस् ॲन्ड पब्लिसिटी यांचे सहकार्याने  सालाबादप्रमाणे परंपरेनुसार याही वर्षी  दीपावली-पाडवा निमित्त ‘घर तेथे रांगोळी’ स्पर्धेचे आयोजन याही वर्षी कुठलेही प्रवेश शुल्क न आकारता भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने सहभागी स्पर्धकांच्या घरासमोरील अंगणात बुधवार दि.२६ ऑक्टोबर २०२२ रोजी सूर्योदयापासून ते सकाळी ९.३० पर्यंत करण्यात आले होते.यात दर्जेदार व नयनरम्य रांगोळी साकारून सलग दहाव्या वर्षी कोपरगावकरानी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

              शुभकार्याची सुरुवात करताना प्रथम घरापुढे रांगोळी काढण्याची भारत वर्षात मोठी परंपरा आहे.६४ कला प्रकारामध्ये रांगोळी कलेला महत्व आहे. सूर्यतेज संस्थेचा कोपरगाव फेस्टिवल अंतर्गत घर तेथे रांगोळी हा उत्सव सर्व समावेशक करण्यासाठी बंदिस्त कार्यालय , रांगोळीचा ठराविक आकार, रंग संगती यांचे बंधन न ठेवता या स्पर्धेसाठी पारंपरिक,निसर्गचित्र, व्यक्तीचित्र,सामाजिक विषय,व्यंगचित्र असे पाच विषय ठेवण्यात आले होते.या स्पर्धेत विविध कला प्रकारात कलाकारांनी रांगोळ्या साकारल्या आहेत. प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सहभागी स्पर्धकाच्या प्रत्येक ठिकाणी कलेचे पदवीधर परीक्षण सहाय्यक, छायाचित्रकार,नोंदणी अधिकारी,संस्थेचे

प्रतिनिधी,निरीक्षक,गाईड अशी ऑनलाइन १० पथके तयार करून त्याचा प्राथमिक अहवाल तयार करून व छायाचित्र हे सर्व परीक्षण संदर्भात अंतिम निर्णयासाठी कलेचे उच्च पदवीधर समिती कडे सुपूर्द करण्यात आला आहे.त्याचा अंतिम निकाल प्रसार

माध्यमाद्वारे कळविण्यात येणार असल्याची माहिती परीक्षण समिती प्रमुख सौ.कल्पना हेमंत गीते यांनी दिली आहे.

         प्रत्येक विषयातून प्रथम विजेत्यास कापसे पैठणी, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच विशेष गुणवत्ता रांगोळीस भेटवस्तू,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,यांचे वतीने देण्यात येणार आहे.तसेच राष्ट्रीय आयुर्वेद गुरु वैद्य रामदास आव्हाड,दिपक विसपुते, नारायण अग्रवाल,प्रकाश अमृतसर यांचेसह अनेकांचे सहकार्य मिळत आहे.

                स्पर्धेनिमित्त कोपरगावातील छोटया- छोटया रांगोळी विक्रेत्यांची मोठी विक्री झाली आहे. नियोजन आणि व्यवस्थापनशास्त्र मध्ये ही रांगोळी स्पर्धा महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट समजली जाते.कोपरगावातील रांगोळी कलेत छोटया छोटया कलाकारांमध्ये दडलेले

पैलू या निमित्त पहावयास मिळाले.ठिपके, संस्कार भारती,प्रबोधन,विविध निसर्ग व मानव निर्मित वस्तूंचा वापर करून तयार केलेली रांगोळी आणि कृष्णधवल रंगसंगती पासून सप्त रंगांची मुक्त उधळण केलेली रांगोळी मूळे रांगोली स्पर्धा वैशिठ्य पूर्ण ठरली आहे.

          स्पर्धेचा शुभारंभ सूर्यतेजच्या प्रा.मसुदा दारूवाला यांनी कोपरगाव भूषण आदर्श शिक्षिका स्व.विद्याबाई जोशी यांची व्यक्ती रेखा विशेष प्रदर्शनार्थी साकारुन त्यांचा कार्यगौरव केला आहे.या स्पर्धेत प्रवेश विनामूल्य असल्याने गरीब सर्व सामन्यांच्या दारापासून ते बंगल्याच्या गच्ची पर्यंत सर्व स्तरावरचा सहभाग हा स्पर्धेचा मानबिंदू ठरला आहे.

          या स्पर्धेत मुली-महिलासह तरुण पुरुषांनीही लक्षणीय सहभाग घेतला.दिवसेंदिवस लोप पावत चाललेले सण-उत्सव-परंपरा उर्जित ठेवण्यासाठी सूर्यतेज संस्थेनेे घर तेथे रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके,प्रा.सौ.लताताई भामरे, प्रा.सौ.कल्पनाताई गीते,ॲड.सौ.स्मिमाताई जोशी,प्रा.मसुदा दारुवाला,प्रा.प्राजक्ता राजेभोसले,डॉ.नीलिमाताई आव्हाड,सौ.स्नेहलताई पगारे,सौ.भाग्यश्रीताई जोशी,सौ.वासंतीताई गोजारे,सौ.वनिताताई भसाळे,प्रा ऋतुजा कोळपकर,प्रा.अनिल अमृतकर,प्रा.मतीन दारुवाला,प्रा.अतुल कोताडे,जयंत विसपुते,अमोल शिंपी,प्रा.अमोल निर्मळ,प्रा.वंदना अलई,प्रा.माधवी पेटकर,ॲड.महेश भिडे,दिपक शिंदे,दिपक येवले,महेश थोरात,अनंत गोडसे,ओम कपोते,कल्पेश टोरपे, अमोल पवार यासह सूर्यतेज संस्थेचे सदस्य कलाध्यापक संघटना,नाट्य परिषद ,कलाप्रेमी नागरिकांचे सहकार्य लाभले आहे.अनेक नयनरम्य रांगोळी प्रदर्शन मुळे परिसरातील लोकांनी रांगोळी कलाकार व आयोजकांचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here