हिंदी मंडळाच्या शिक्षक वक्तृत्व स्पर्धेत संगीता काळे प्रथम

0

सातारा/अनिल वीर : जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने बारावीपर्यंतच्या हिंदी शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरावरील स्पर्धेमध्ये येथील अनंत इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका श्रीमती संगिता काळे यांनी प्रथम क्रमांक पटकवला आहे.

    मंडळाचे पूर्व अध्यापक कै.एम. आर. शिंदे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ येथील राष्ट्रभाषा भवनाच्या सभागृहात पार पडलेल्या स्पर्धेमध्ये १९ शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील अन्य क्रमांकाचे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत.

      द्वितीय  क्रमांक -रवींद्र बागडी ( म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालय, पाल), तृतीय क्रमांक विभागून- सौ उज्वला मोरे (विठामाता विद्यालय कराड) व संजय शिंदे (जागृती विद्यालय, (बनवडी), याशिवाय,श्रीमती सुनंदा गाढवे ( खंडाळा),अविनाश जंगम ( डिस्कळ-खटाव) व प्रशांत चोरगे (औंध -खटाव) यांनी उत्तेजनार्थ म्हणून यश संपादन केले..परीक्षक म्हणून अनंत यादव, जुबेर बोरगावकर व अनिलकुमार यादव यांनी काम पाहिले. याबद्धल अध्यक्ष ता.का.सूर्यवंशी, उपाध्यक्ष शाहनवाज मुजावर, परीक्षा मंत्री शिवाजीराव खामकर, सहकार्यवाह सुनंदा शिवदास, पतसंस्था अध्यक्ष हणमंत सूर्यवंशी,कार्यकारिणी व हिंदीप्रेमींन यशस्वी शिक्षकांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here