चार्ल्स शोभराजची नेपाळ सुप्रीम कोर्टाने केली सुटका

0

नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने बुधवारी (21 डिसेंबरला) सिरीयल किलर चार्ल्स शोभराजला सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याला फ्रेंच पर्यटकांना विष देऊन मारल्याच्या आरोपाखाली भारतातही अटक झाली होती.

नेपाळ कोर्टाने येत्या पंधरा दिवसात त्याला सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याला त्याच्या देशात फ्रान्समध्ये पाठवण्याचा आदेशही दिला आहे.

शोभराज आता 78 वर्षांचा आहे. तब्येतीच्या कारणावरून त्याने सुटकेची मागणी केली होती. बीबीसी हिंदींने ही बातमी दिली आहे.

चार्ल्स शोभराज बिकिनी किलर म्हणूनही ओळखला जातो. कारण त्याने हत्या केलेल्या बहुतांश बायका बिकिनी घातलेल्या अवस्थेत सापडल्या होत्या. तसंच त्याने पोलिसांना अनेकदा गुंगारा दिला होता. 1976 मध्ये भारतात त्याला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here