सातारा येथे द्वंद्व गीतांची मैफिल उशिरापर्यंत रंगतदार संपन्न

0

सातारा : दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व कराओके सिंगर्स क्लब प्रस्तुत द्वंद्व गीतांची (Duets) सुश्राव्य मैफिल सुनहरे प्यार भरे नगमें हा कार्यक्रम येथील दिपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात रंगतदार उशिरापर्यंत सजला होता.

          उद्घाटक म्हणून काका पाटील,अनिल वीर,शिरीष चिटणीस व मुथा मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वन करण्यात आले. यावेळी क्लबचे अध्यक्ष विजय साबळे,पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले आदींची उपस्थिती होती. कलाकार असणारे डॉ.सुनील पटवर्धन, सचिन शेरकर,लियाकत शेख, सुहास पाटील, नागेंद्र पाटील, चंद्रशेखर बोकील, सुधीर चव्हाण, राजेश जोशी, बापूलाल सुतार, शिवकुमार, आग्नेश शिंदे, मंजुषा पोतनीस, स्मिता शेरकर, सुप्रिया चव्हाण, सुनिता शालगर, कविता शिवकुमार, सुषमा बगाडे, दिपाली घाटगे, तेजल पवार, वनिता कुंभार, पूजा शहा आदीनी  गाणी मनातली सादर करून श्रीतावर्गाना मंत्रमुग्ध केले.ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे यांची होती. 

निवेदक म्हणून सुधीर चव्हाण यांनी सुरेख असे काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here