स्त्री मुक्तीचा मार्ग बाबासाहेबांनी दिल्याने सर्व क्षेत्रात महिलांच आघाडीवर आहेत.

0

सातारा : महिला विरोधी रचना केलेल्या मनुस्मृतीचे दहन केले होते.स्त्री मुक्तीचा मार्ग बाबासाहेबांनी दिला होता. म्हणूनच महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आढळून येत आहेत.

    स्त्री मुक्ती दिन व मनुस्मृती दिन धम्मबांधव उत्सव कमिटीचे अध्यक्ष शामराव बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ संपन्न झाला. तेव्हा अभिवादनपर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

  प्रारंभी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास द्राक्षा खंडकर आणि पालिका कर्मचारी महिला यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भन्ते दिंपकर व अन्य तसेच दिलीप फणसे, नंदकुमार काळे व महादेव मोरे यांनी पुष्पांजली वाहिली. सामुदायिक वंदना घेण्यात आली. मनुस्मृती दहन ही साधारण गोष्ट नाही. ती एका विशिष्ट समाजाने सर्व समाजासाठी अंमलात आणलेली घटना होती.या घटनेला परावृत्त करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना भारतीय राज्यघटनेकडे घेऊन गेले. त्यामुळे कोणी काहीही म्हटले तरी अंतिमतः संविधान मजबूतच राहणार आहे.तरीही सतर्क राहुन समाजातील सर्व घटकांनी संघटित होऊन विरोधकांना सन २०२४ च्या निवडणुकांत नामोहरण केले पाहिजे.भारतीय राज्यघटना ही नव्याने वाचली पाहिजे. स्वतःमधील जुनाट संस्कारांचे दहन केले पाहिजे.

           यावेळी संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रमेश इंजे,जे.डी. कांबळे,रिपब्लिकन सेनेचे पश्चिम  विभागीय अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत आदींनी अभ्यासपूर्ण माहिती कथन केली.धम्मबांधव उत्सव कमिटीचे संस्थापक अनिल वीर यांनी प्रास्ताविक केले.वंचित बहुजन मोर्चाचे महासचिव श्रीरंग वाघमारे यांनी आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास माजी केंद्रप्रमुख रामचंद्र गायकवाड, वंचित संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष सुधाकर काकडे, समता सैनिक दलाचे आकाश कांबळे, आकाश माने,स्नेहल खरात,पूजा खरात,सौ.कविता कांबळे,प्रदेश रिपब्लिकन सेनेचे सदस्य गणेश कारंडे,दिलीप सावंत,भारतीय बौद्ध महासभा तसेच इतर तत्सम संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here