आ. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ९१ लाख रुपये मंजूर

0

संगमनेर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा परिषद सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीच्या पंधराव्या वित्त आयोग या योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील विकास कामांसाठी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली.
         या निधीबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत थोरात म्हणाले की, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावच्या विकासासाठी मोठा निधी मिळवला आहे. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून देवकौठे ते बोटा हा साधारण शंभर किलोमीटरचा विस्तीर्ण तालुका आहे. १७१ गावे व २५० च्या पुढे वाडी वस्ती असलेला हा तालुका आहे.संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य, शिक्षण, दळणवळण, सिमेंट बंधारे ,रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना यांसह अनेक विकासाच्या योजना आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने राबविल्या आहेत . सहकारातून समृद्धी निर्माण झालेला हा तालुका राज्यात विकसित असलेल्या पहिल्या पाच तालुक्यांमध्ये गणला जातो.
           अहमदनगर जिल्हा परिषद सन २०२१- २२ या आर्थिक वर्षासाठी पंधरावा वित्त आयोग या योजनेअंतर्गत रायते येथील हनुमान मंदिरासमोर सभा मंडप बांधण्यासाठी ५ लाख रुपये, वाघापूर येथील स्वामी समर्थ केंद्र ते गव्हाळी वस्ती रस्ता मजबुतीकरणासाठी ५ लाख रुपये ,मालूजे ते जुने अंभोरे रस्ता मजबुती करण्यासाठी ७ लाख रुपये, डीग्रस येथील ग्रामपंचायत कार्यालयावरती सभागृह बांधण्यासाठी ८ लाख रुपये, अंभोरे येथे आदिवासी वस्ती रस्ता मजबुती करण्यासाठी ६ लाख रुपये, पिंपरने ते कनोली शिवरस्ता मजबुतीकरण ७ लाख रुपये ,घुलेवाडी कचरा व्यवस्थापन घंटागाडी खरेदीसाठी ५ लाख रुपये, चिखली येथे शिवछत्रपती स्मारक सुशोभीकरणासाठी ५ लाख रुपये, पिंपळगाव कोंजीरा येथे स्मशानभूमी सुशोभीकरण ५ लाख रुपये, वरुडी पठार येथील स्मशानभूमी सुशोभीकरण ४ लाख रुपये, तळेगाव दिघे येथील महादेव मंदिर परिसर सुशोभीकरण ५ लाख रुपये, करुले येथे विठ्ठल मंदिर सभामंडप ५ लाख रुपये, हिवरगाव पावसा खंडोबा मंदिर सुशोभीकरण पेविंग ब्लॉक करण्यासाठी ५ लाख रुपये, निमोन येथे दशक्रिया घाट सुशोभीकरणासाठी ५ लाख रुपये, वरवंडी येथील स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी ५ लाख रुपये, आणि डोळासने येथील ठाकर वस्ती अंतर्गत पाटणवाडी डुबेवाडी हे रस्ता डांबरी करण्यासाठी ९ लाख रुपये असे एकूण ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या निधीसाठी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी पाठपुरावा केला असून हा निधी मिळाल्याबद्दल वरील सर्व गावातील नागरिक व महिला यांनी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व सर्व संबंधित जिल्हा परिषद सदस्य यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here