कोपरगाव :- दि. २१ तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे मयत सभासदांच्या दोन वारसांना प्रत्येकी दोन लाख रूपये प्रमाणे चार लाख रूपये विमा धनादेशची रक्कम संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते शुक्रवारी प्रदान करण्यात आली.
याबाबतची माहिती अशी की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे सर्व सभासद व कायम कामगारांचा प्रत्येकी दोन लाख रूपयांचा अपघाती विमा अध्यक्ष विवेक कोल्हे व संचालक मंडळाने न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडुन उतरविला आहे.
कारखान्याचे सभासद मोहनराव रामचंद्र वक्ते (जेउरकुंभारी), व चांगदेव रघुनाथ भोसले (मंजुर) यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. व्यवस्थापन व शेअर्स विभागाने त्यांच्या वारसाकडुन आवश्यक ती सर्व कागदपत्रांची पुर्तता करून न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडे अपघात विमा प्रस्ताव दाखल करून तो मंजुर झाला. मयत सभासदांच्या वारस पत्नी श्रीमती इंदुबाई मोहनराव वक्ते व श्रीमती कलावती चांगदेव भोसले यांना प्रत्येकी दोन लाख रूपयांचा विमा धनादेश शुक्रवारी कारखाना कार्यस्थळावर बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यांत आला. विमा ही काळाची गरज असून सभासद शेतक-यांसह नागरिकांनी त्याबाबत नेहमीच जागरूकता ठेवावी असे ते म्हणाले.
याप्रसंगी कारखान्यांचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, मनेष गाडे, निलेश देवकर, बापूराव बारहाते, त्रंबकराव सरोदे, रमेश आभाळे, सतिष आव्हाड, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, संजयराव औताडे, बाळासाहेब पानगव्हाणे, बापूसाहेब औताडे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सचिव विधीज्ञ तुळशीराम कानवडे, उस व्यवस्थापक जी. बी. शिंदे, उसविकास अधिकारी शिवाजीराव देवकर, सी. एन. वल्टे यांच्यासह विविध संस्थांचे संचालक, शेतकरी सभासद उपस्थित होते.