बालमटाकळी– ( जयप्रकाश बागडे )
कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला पुन्हा ऑक्सिजनची कमतरता भासू नये या उद्देशाने संस्कृती सयाजी गव्हाणे या पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकलीने आपल्या वाढदिवसानिमित्त 200 छोट्या मैत्रिणींना छोटसं झाडाचं रोपट देऊन जगवण्याचा आणि त्यातून भविष्यात सर्वांना ऑक्सिजन मिळवता येईल या उद्देशाने वृक्षारोपण करून हा संकल्प केला आहे .
शासन ” झाडे लावा , झाडे जगवा ” फक्त जाहिरातीद्वारे प्रचार , प्रसार करीत आहे मात्र प्रत्यक्षात झाडे लावण्यापेक्षा वृक्षतोडीवर चोरट्या मार्गाने मोठी भर घातली जात असून सुद्धा वनाधिकारी उघड्या डोळ्याने फक्त वृक्षतोड करताना पाहत आहेत , परंतु शेवगाव तालुक्याच्या मौजे मुरमी येथील इयत्ता पहिली च्या वर्गात शिकणारी सात वर्षे वयाची संस्कृती सयाजी गव्हाणे या चिमुकलीने आपल्या वाढदिवसानिमित्त किमान 200 हून अधिक आपल्या लहानग्या मैत्रिणींना छोटसं झाडाचे रोपटे देऊन त्याचे संगोपन करून वटवृक्षात रूपांतर करून मागील महाभयंकर अशा कोरोना महामारीत ऑक्सिजनची कमतरता भासल्यामुळे अनेकांना पर्यायाने आपला जीव गमावा लागला याची पुन्हा पुर्नरावृत्ती होऊ नये आणि ऑक्सिजनची कमतरता भासू नये या उद्देशाने या चिमुकलीने वृक्षरोपणाचा संकल्प हाती घेऊन आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी वडील सयाजी गव्हाणे व आई राधा गव्हाणे यांना ही गोष्ट सांगून तिने आपला वाढदिवस अशा आगळे वेगळ्या पद्धतीने साजरा करून स्नेहभजनाबरोबरच मनोरंजनात्मक अशा कार्यक्रमाची मेजवानीही दिली , कार्यक्रमासाठी रामभाऊ गव्हाणे लिंबाजी गव्हाणे लवंगाबाई गव्हाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नितीनराव काकडे, शेषराव मामा वंजारी, ग्रामपंचायत सदस्य महादेव गायकवाड, भारत बांमदळे , ज्ञानेश्वर वैद्य , ज्योतीराम शेळके, आदिनाथ मासाळकर , सुभाष चेडे , अशोक काजळे , अशोक गरड , भोलेनाथ गरड , हरिभाऊ केसभट , मानसिंग देशमुख, योगेश पोकळे , सचिन वैद्य सर , इब्राहिम शेख सर , आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ,