मणिपूरमध्ये शूट अॅट साईटची ऑर्डर, संपूर्ण राज्यात कर्फ्यू, सैन्याचा फ्लॅग मार्च

0

मणिपूरमध्ये ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनने एका सभेचं आयोजन केलं होतं. त्यानंतर तिथं हिंसाचार सुरू झाला आहे.

या हिंसाचारानंतर मणिपूरच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आसाम रायफल्सच्या जवानांना तैनात करण्यात आलं आहे.आधी लष्कराकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, त्यांनी राज्य पोलिसांच्या मदतीने हिंसाचारावर नियंत्रण मिळवलं आहे. तसंच त्यांनी फ्लॅगमार्चसुद्धा केला आहे.बुधवारपासून (3 मे) संपूर्ण राज्यात मोबाईल इंटरनेट सेवा पुढच्या पाच दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर हिंसाचाराचे फोटो आणि व्हीडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहे. त्यात अनेक घरं जळताना दिसत आहेत. एका व्हीडिओमध्ये तर हिंसक जमाव हत्याराने दुकान फोडताना आणि बंदुका चोरताना दिसत आहेत.

दरम्यान, अशा कुठल्याही व्हीडिओ किंवा फोटोंची बीबीसीने स्वतंत्र पडताळणी केलेली नाही. प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत या हिसंचारात कमीतकमी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरूवारी (4 मे) याबाबत मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. त्यांनी राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी एक व्हीडिओ जारी करून सर्व लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममचा बॅनर्जी यांनी ट्वीट करून या हिंसाचाराबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.त्यांनी म्हटलंय, “ही वेळ राजकारण करण्याची नाही. राजकारण आणि निवडणुका वाट पाहू शकतात. पण सध्या सर्वांत सुंदर राज्य मणिपूरला वाचवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे.”

पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, तोरबंदमध्ये अशाच प्रकारच्या मोर्चाच्या दरम्यान हजारो आदिवासी लोक जमले होते तेव्हा आदिवासी आणि गैरआदिवासींमध्ये हिंसा भडकली.

सर्वांत जास्त हिंसाचार विष्णूपूर आणि चुराचांदपूर जिल्ह्यांमध्ये झाला आहे, तसंच राजधानी इंफाळमध्ये गुरुवारी हिंसाचार उसळला.

या परिस्थितीवर बीबीसीशी बोलताना लष्कराचे पीआरओ लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितलं, “आता स्थिती नियंत्रणात आहे. आज (गुरुवार) सकाळीच हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.”

त्यांनी पुढे सांगितलं, “ 3 आणि 4 मे रोजी मणिपूरमध्ये लष्कर आणि आसाम रायफल्सला पाचारण करण्यात आलं आहे. त्यानंतर आमचे जवान सतत हिंसाचार झालेल्या भागात परिस्थिती अटोक्यात आणण्यासाठी काम करत आहेत. हिंसाचार झालेल्या ग्रामिण भागातून आतापर्यंत 4 हजार लोकांना सुरक्षित स्थलांतरीत करण्यात आलं आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी फ्लॅगमार्च देखील करण्यात आला आहे.”

रावत यांच्यानुसार राज्यात कायदा सूव्यवस्था राखण्यासाठी सर्व समुदायांच्या 9 हजारहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी अभियान राबवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here