फलटण प्रतिनिधी :
उपळवे ता. फलटण येथील कारखान्याच्या मालकीची तीन लाख 75 हजार रुपये किमतीच्या ट्रॅक्टर गाड्या चोरून नेल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार 10 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान उपळवे ता. फलटण गावाच्या हद्दीतील कॅनॉलच्या पुलाजवळील तळावरून अंबादास बाळू सांगळे रा. माळेगाव, ता. शिरूर कासार जि.बीड याने फिर्यादी विनय राजेंद्र पुजारी यांच्या कारखान्याच्या सुमारे पावणे चार लाख रुपये किमतीच्या तीन केसरी रंगाच्या लोखंडी ट्रॅक्टर गाड्या संमतीशिवाय लबाडीने चोरून नेल्या आहेत त्यामुळे विनय पुजारी यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास स. पोलीस फौजदार राऊत करीत आहेत.