फलटण प्रतिनिधी.:
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कैलासवासी नंदकुमार आबाजी भोईटे मित्र मंडळ यांनी महाराष्ट्र केसरी फलटण बैलगाडा शर्यत आयोजित केलेली आहे. शनिवार दि. सहा मे रोजी फलटण नजीक जाधव वाडी येथील साई मंदिरासमोरील पटांगणात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
शनिवारी सकाळी नऊ वाजता श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार दीपकराव चव्हाण उपस्थित राहणार आहेत या निमित्ताने फलटण शहरातील विविध मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. सुमारे वीस वर्षानंतर प्रथमच बैलगाडा स्पर्धांचे आयोजन या ठिकाणी करण्यात येत या स्पर्धेत यशस्वी स्पर्धकांना बक्षीस रूपाने दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत. स्पर्धा आयोजनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून न्याय पद्धतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. त्यामुळे स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे आणि या स्पर्धांचा आनंद उपभोगण्यासाठी फलटणवासी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक अमित भोईटे आणि अमोल भोईटे यांनी केले आहे. सुमारे पाचशे स्पर्धक त्यामध्ये सहभागी होणार असल्याचे संयोजकांतर्फे सांगण्यात आले आह.या स्पर्धांचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ शनिवारी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.