फलटण प्रतिनिधी. :
भाडळी खुर्द ता/ फलटण येथे शेतात लावलेले पोकलेन मशीन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची थोडक्यात हकीगत अशी की 1 जानेवारी ते 2 मे 23 पर्यंत भाडळी खुर्द येथे सचिन विनायक बोके याचे शेतात सनी लक्ष्मण कदम रा. ऐश्वर्या रेसिडेन्सी, लक्ष्मी नगर ,फलटण यांचा सुमारे पाच लाख रुपये किमतीचे टाटा हिताची कंपनीचे पोकलेन मशीन लावलेले होते. कामा अभावी ते त्याच ठिकाणी होते. दोन एप्रिल रोजी फिर्यादी कदम हे मशीन पाहण्यासाठी गेले असता ते मशीन त्या जागी आढळून आले नाही. ते कोणीतरी चोरून नेले असल्याची बाब लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आहे. सपोनी प्रकाश खाडे पुढील तपास करत आहेत.