कुकाणा प्रतिनिधी : स्वर्गीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्याबाई होळकर पुरस्कार भगुर ता. शेवगावचे सरपंच वैभव पुरनाळे याच्या हस्ते ट्रॉफी ,रोख रक्कम देऊन ,ग्रामसेवक पाचरणे मॅडम ,भगूर ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत उमेद अभियानाची बचत गटाची महिला परवीन शेख ,उषाताई घाडगे यांना हा पुरस्कार देण्यात आला. सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरी बद्दल देण्यात आला.महिला व बाल विकास महाराष्ट्र शासन अहिल्यादेवी होळकर पुरस्कार या सन्माननीय गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मा.आ.चंद्रशेखर घुले,क्षितिज घुले पाटील, हर्शदाताई काकदे यानी हार्दिक अभिनंदन केले आहे.