बुलडाणा :दि २ जून रोजी टिळक भवन मुंबई येथे महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मा नाना पटोले यांचे अध्यक्षतेखाली, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात व इतर प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी व बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना देखील बुलडाणा लोकसभेची जागा काँग्रेसला सोडून घेण्यासाठी देखील चर्चा करण्यात आली. बुलडाणा लोकसभेचा उमेदवार कोण असेल यावरचे मत जाणून घेण्यासाठी निमंत्रित केले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष मान राहुल बोंद्रे यांनी जिल्ह्याचा सविस्तर अहवाल दिला व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा यावेळी काँग्रेस पक्षाला हा मतदार सोडून घेण्यात यावा, आम्ही आमचा एक तगडा उमेदवार देऊ. त्यासाठी आमचे नेते मा मुकुल वासनीक यांचे मत जाणून घ्यावे कारण त्यांना जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास आहे.अशा पद्धतीने मत मांडले.
बुलडाणा जिल्हा प्रभारी मा नानाभाऊ गावंडे यांनी बुलडाणा व विदर्भातील परिस्थितीवर प्रखरपणे मत मांडले, जिल्ह्यातील पक्षाचा उमेदवार कोण, यावर साधक बाधक चर्चा झाली. त्यावेळी चार-पाच नावे समोर आली.आमदार मा धीरज लिंगडे, मा आ हर्षवर्धन सपकाळ , शामभाऊ उमाळकर, लक्ष्मणराव घुमरे, दिलीपराव जाधव, यांनी आपापले मत मांडले.
यावेळी दिलीप भोजराज प्रदेश पक्ष निरीक्षक सौ जयश्रीताई शेळके डॉ अरविंद कोलते दादू शेठ रामविजय बुरूंगले मा धनंजय देशमुख मा सौ स्वातीताई वाकीकर अनंतराव वानखेडे हरीश रावळ गौतम गवई सतीश मेहेंद्रे, मनोज कायंदे सुनील सपकाळ,अँड गणेशसिंग राजपूत, प्रमोद दादा अवसरमोल शैलेश खेडकर प्रा खर्चे मा मोईन काझी एकनाथ चव्हाण इ उपस्थित होते.