क्लासचे बहुतेक आपापल्या शाळेत ठरले अव्वल
अहमदनगर (प्रतिनिधी) : सततचा पाठपुरावा, टेस्ट सिरीज मध्ये ठेवलेले सातत्य आणि कष्टाळू गुणवंत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनती मुळे अविनाश क्लास च्या सुपर ३० विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वि बोर्डाच्या परीक्षेत ८० टक्क्या पेक्षा जास्त मार्क्स मिळवले आहे. विद्यार्थांचा बुध्यांक ओळखून तयार करण्यात आलेला योग्य अध्यापनाचा आकृतिबंध , क्लास च्या सर्व फॅकल्टीने दिलेले योगदान आणि मुलांची गुणवत्ता तसेच कष्ट यामुळेच आपण हे यश संपादन करू शकलो असे अविनाश क्लासेस चे संस्थापक प्रा. अविनाश जाधव यांनी सांगितले. या वर्षी लागलेल्या इयत्ता १० वी च्या निकालात सर्वच बोर्डात क्लासच्या गुणवंत विद्यार्थांनी यशोशिखरावर आपला झेंडा रोवल्याचे चित्र दिसले. पुणे बोर्डात इंग्लिश मिडीयम मध्ये क्लास च्या पूर्वा काळे हिने ९६.६ % गुण मिळवून ती क्लास मध्ये पहिली आली. आपल्या शाळेत देखील ती सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होणारी सर्वात हुशार विद्यार्थिनी ठरली. सी बी एस सी पेटर्न मध्ये रोनक पुरी याला ९१ % तर पुणे बोर्ड सेमी इंग्लिश मध्ये रुखसार हवालदार हि ९१.६ % गुण मिळवून ती त्या विभागात क्लास मध्ये आणि शाळेत पहिली आली. त्या खालोखाल सी बी एस सी पेटर्न मध्ये युवराज आहेर (९०%), श्रुष्टि वाकळे (९०%), कृष्णा जगदाळे(८७%),बेलेश्वर पेंदाम (८६%),अथर्व मुळे(८६%),राशी द्रविड (८५.२०%),रोहन लोंढे (८५%),स्वयंम ललवाणी(८१%) आणि अस्मित नय्यर (८०%). पुणे बोर्ड इंग्लिश मिडीयम मध्ये संस्कृती दाते (९३.४०%), ऋतुजा जावळे(९३.४०%), शुभम शिंदे (९२.४०%), शुभम सांगळे(९१%), प्रणव मुरकुटे(९१%), यश काळे(८५%),सुमेध सोनावणे(८०%). तर पुणे बोर्ड सेमी इंग्लिश माध्यमात कृष्णाली रपेली(९१.४०%), समृद्धी अकलोकर (९१.२०%), भूषण निकम (८६%), अभिजित अनमल (८६%), तन्मय भोंगळ(८३.४०%), कृष्णा बावा (८९.८०%), ओम कर्डीले(८६%), गीता खोले (८६%). शिववर्धन गायकवाड (८८%). या विद्यार्थाना प्रा. अविनाश जाधव, सौ. वैशाली जाधव, सुमित सर रोहित साहिनी सारिका ठाकूर , प्रिया मनोचा, स्मृती निक्ते , वैशाली शिंदे, प्राजक्ता सग्गम, अश्विनी देसले, तृप्ती कर्नावट, सुजाता तुवर, चारू मिरीकर, या अध्यापकांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.