चिरनेर बापुजी देव परिसरात असलेल्या खदानीमध्ये चिखलात अडकलेल्या गाईला मिळाले जीवनदान

0

उरण दि ७(विठ्ठल ममताबादे ) :

दि.०५ जुन २०२३ रोजी चिरनेर बापुजी देव मंदिरा पासुन काही अंतरावर असलेल्या खदानी मध्ये मुकी जनावर तहान भागविन्यासाठी पाणी पिण्यासाठी जात असतात. पाणी पीऊन सर्व जनावर बाहेर निघाली परंतु एक गाय चिखलात अडकली. तीला बाहेर निघता येत नव्हते . ही बातमी केअर ऑफ नेचर संस्थेचे उपाध्यक्ष  महेश पाटील यांना समजताच श्री. महागणपती अकॅडेमी चिरनेरचे विद्यार्थी कु.अतिष नारंगीकर,जयहिंद ठाकुर,प्रेमल पाटील, अदित्य डुंगीकर यांना घेऊन त्या ठीकाणी गेले.सर्व पहानी करुन आपल्या साथीदारांच्या मदतीने त्या गाईला बाहेर काढण्यात आले .ही बातमी गावात समजताच केअर ऑफ नेचर आणि श्री. महागणपती अकॅडेमीच्या पदाधिकाऱ्यांचे सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आणि या पुढेही असेच चांगली काम तुमच्या हातुन व्हावे असे शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here