श्री नर्मदेश्वर फाउंडेशनचा उपक्रम
सोनेवाडी (वार्ताहर) : महाराष्ट्रातील बारा हजार महादेव मंदिरांसाठी बारा हजार बेल व बारा हजार कैलासपती वृक्ष लावण्याचा संकल्प श्री नर्मदेश्वर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला होता. त्याची सुरुवात काल चांदेकसारे महादेव मंदिरांच्या समोर महादेव मंदिर बांधकाम कृती समिती सदस्याच्या हस्ते करण्यात आली.चांदेकसारे महादेव मंदिर परिसरात फाउंडेशनच्या सदस्यांनी श्रमदानातून खड्डे घेत वृक्षारोपण केले.
यावेळी मंदिर बांधकाम कृती समितीचे अध्यक्ष अशोक होन, सदस्य किशोर होन, उपसरपंच सचिन होन, नर्मदेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सागर केकान, दिलिप शिंदे, अभिषेक केकाण, पांडुरंग शिंदे,कुणाल शिंदे, किशोर होन, नितीन होन, अशोक होन, रोहित होन , सुधिर चव्हाण, अर्जुन बोरालके, पत्रकार शिवाजी जाधव, पुजारी बबलू उबाळे अदी उपस्थित होते.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर केकान यांनी माहिती देताना सांगितले की हिंदू धर्माच्या संस्कृती प्रमाणे या दोन्ही वृक्षांचे अध्यात्मिक महत्व विशेष आहे. कैलासपती फुलांचा आकार महादेवाच्या पिंडी सारखा व शेषनागासारखा आहे. हे झाड जंतुना मारणारे जंतुनाशक, त्वचाच्या आजारावर गुणकारी तसेच फळे कृमीनाशक आहे. झाडाचे आयुष्यमान दीडशे वर्ष असून झाडाची वाढ 90 वर्षापर्यंत असते वातावरणातील जिवाणू विषाणू बूस्टर व किटाणूंचा ते नास करते. तर बेलाचे झाड ही महादेवास प्रिय असुन बेलाच्या पानांमध्ये शिवतत्त्व अधिक प्रमाणात असते. वात पित्त कफ यांचा समतोल राखते. सर्पदंश काविळ मुळव्याध हाडीताप इत्यादीवरती ते गुणकारी असते त्याची सावली शितल व आरोग्यकारक आहे असेही सागर केकाण यांनी सांगितले.श्री नर्मदेश्वर फाउंडेशन च्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत असून साधारण दोन वर्षे वयोगटातील झाडे लावण्याची सुरुवात कोपरगाव तालुक्यापासून त्यांनी केली आहे. कार्यक्रमाचे आभार अशोक होन यांनी मानले.