पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 9 वर्षे पुर्ती निमित्ताने भाजपा महा-जनसंपर्क अभियान लाभार्थी संंमेलन पैठण येथे आयोजित करण्यात आले होते.
पैठण,दिं.२६, प्रतिनिधी : मोदी सरकारने नऊ वर्षात गोरगरीब जनतेला विविध योजनांच्या माध्यमातून आणलेल्या शासकीय योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचल्या ज्या देशात सर्व जनतेचे बँक खाते नाही आशा लोकांना सांगितले की बँकेत जाऊन मोफत बँक खाते उघडा हे खाते खोलण्याचे कारण असे आहे की प्रत्येक शासकीय योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहेत.हा फायदा खाते खोलण्याचा झाला.शौचालय, प्रधानमंत्री आवास योजना, या योजनेत 710 पहिला टप्पा, दुसरा टप्पा 400 एकूण 1100 घरे ज्यांच्या घरात विज कनेक्शन नव्हते त्यांना विज कनेक्शन दिले.
मोदिजींनी प्रत्येकाला शासकीय योजना दिल्या आहेत. असे प्रतिपादन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे मोदी सरकारच्या 9 वर्षे पुर्ती निमित्त भाजपा महा-जनसंपर्क अभियान लाभार्थी संमेलनात पैठण येथे ते बोलत होते.
मोदी सरकारच्या 9 वर्षे पुर्ती निमित्त भारतीय जनता पार्टी पैठणच्या वतीने, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेबजी पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भाजपा महा-जनसंपर्क अभियाना अंतर्गत लाभार्थी संंमेलनाचे भारतीय जनता पार्टी पैठणने केले होते लाभार्थी संमेलनाचे संयोजक तथा माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे,भाजपा तालुकाध्यक्ष डॉ सुनील पाटील शिंदे,जिल्हा संघटन सरचिटणीस लक्ष्मण पाटील औटे,भाजपा शहराध्यक्ष शेखर पाटील,महा-जनसंपर्क अभियानाचे तालुका संयोजक प्रा महादेव बटूळे यांच्या नेतृत्वाखाली दि. 26 जुन 2023 रोजी पैठण शहरातील पितांबरी मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते.
यावेळी केंद्रीय रेल्व राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की,या देशात 140 कोटी लोंकापैकी 80 कोटी गरीब लोकांना धान्य मोफत दिले जाते व 100 रुपायांत उज्वला गॅस योजने अंतर्गत कनेक्शन देण्यात आले जनतेला गँस शंभर रुपयात देणारे माझं सरकार गरीबांच्या प्रती समर्पित राहील माझं सरकार शेतकरी समर्पित राहिल.हा देश गरिबांचा देश आहे.जनतेने मोदी सरकारला निवडून दिले. प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतीचा इन्शुरन्स भरला आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार व मोदी सरकारने 22999 रू शेतकऱ्यांचा इन्शुरन्स भरला आहे. राशन दुकानात एक रुपयाही न देता 70 कोटी लोकांना मोफत अन्न धान्य देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.जेव्हा यांना पदे लागते तेव्हा भाजप जातीवादी नाही. जेव्हा पद लागत नाही तेव्हा भाजप जाती वादी आहे.देश का नेता कैसा हो मोदी जी जैसा हो या घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी रेखाताई कुलकर्णी,नम्रता पटेल, पैठण 110-विधानसभा निवडणूक प्रमुख तथा भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष डॉ.सुनील शिंदे,संयोजक लाभार्थी मेळावा माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे,शहराध्यक्ष शेखर पाटील,लक्ष्मण औटे,कल्याण काळे,भाऊसाहेब काळे,भाऊसाहेब बोरुडे, माजी नगरसेवक बंडू आंधाळे, प्रशांत आव्हाड,भाजपा युवानेते विशाल पोहेकर,विजय चाटुपळे सह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.