विष्णुपुरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्मशानभूमीत वृक्षारोपण..

0

नांदेड – पंधराव्या वित आयोग व जिल्हा नियोजन समितीच्या जन सुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमी सुशोभीकरण करून कायापालट करून या ठिकाणी  ग्रामपंचायत विष्णुपुरी कार्यालय यांच्या वतीने काळेश्वर मंदिर परिसरातील स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले.

  विष्णुपुरी काळेश्वर मंदिर परिसरालगत असलेल्या स्मशानभूमीत जिल्हा नियोजन समिती अंतर्गत असलेल्या जनसुविधा योजना अंतर्गत निधीतून पेव्हर ब्लॉक बसविण्यात येऊन स्मशानभूमीचा विकास करण्यासाठी कायापालट केला, 7 जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालय विष्णुपुरी यांच्या वतीने स्मशानभूमीत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, यावेळी शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख,डॉ.मनिष कोकरे,

एसजीएस,संचालक अभियांत्रिकी महाविद्यालय विष्णुपुरी,भार्गव राजे,भार्गव करिअर अकॅडमी,शंकर हंबर्डे ,काळेश्वर ट्रस्ट सचिव ,उत्तमराव किसनराव हंबर्डे ,बालाजी आनंदराव हंबर्डे ,विलास आबासाहेब देशमुख ,सरपंच प्रतिनिधी ,विश्वनाथराव हंबर्डे उपसरपंच प्रतिनिधी साहेबराव हंबर्डे माजी जिल्हा परिषद सदस्य, माणिकराव हंबर्डे सेवानिवृत्ती उपनिरीक्षक,प्रवीण पंडित  हंबर्डे पोलीस पाटील,प्रभू देवराव हंबर्डे माजी सैनिक ,शिवाजी किशनराव हंबर्डे माजी सैनिक,राजेश बालाजी हंबर्डे,सोम भारती  महाराज ,मारुती हंबर्डे,गोविंदराव माधवराव हंबर्डे नरसिंग हंबर्डे ,बालाजी किशनराव हंबर्डे,माधवराव शामराव हंबर्डे ,चिंतामणी हंबर्डे नारायण बाबुराव हंबर्डे ,अमृतराव लक्ष्मणराव हंबर्डे,संतोष बारसे उत्तमराव हनवते,मजहर सिद्दिकी संजय कानवडे ,ग्रामविकास अधिकारी उज्वला जाधव,मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी,विकास दिग्रसकर स्काऊट मस्टर कृष्णा बिराजदार, उदय हंबर्डे यांच्या सह गावकरी व पत्रकार उपस्थित होते.

स्मशानभूमीत विविध जातींच्या झाडांचा वृक्षारोपण करण्यात आले असून उपस्थित मान्यवरांनी विकासात्मक केलेल्या स्मशानभूमीत फेरफटका मारून ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्ये अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here