जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एकाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न 

0

आरोपीला खर्डा पोलीसांनी केली अटक 

जामखेड तालुका प्रतिनिधी –  जामखेड तालुक्यातील लोणीचे  शिवाजी पवार व त्यांचे दोन साथीदार भाऊसाहेब परकड व भागवत लंगडे हे तिघे दि. ८ जुलै रोजी आनंदनवाडी  शिवारात गेले असता भाऊसाहेब परकड व भागवत लंगडे यांनी जुन्या भांडणाचा राग धरुन फिर्यादी यास बळजबरीने दारु पी म्हणून त्यांना शिवीगाळ केली

  परत घरी जात असताना लोणी गावचे शिवारात वाकी रोडच्या कडेला भाऊसाहेब परकड व भागवत  लंगडे यांनी गाडी थांबुन शिवाजी पवार यास काहीतरी कुरापत काढुण किती वेळ झाले आहे असे विचारले असता मला माहिती नाही असे म्हणाल्याच्या कारणावरुन भाऊसाहेब परकड व भागवत लंगडे यांनी माघील भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादीस लाथाबुक्याने मारहाण करुन शिवीगाळ केली व भाऊसाहेब परकड याने त्याच्या गाडीच्या चावीला काहीतरी धारधार हत्याराने शिवाजी पवार याच्या गळ्यावर मारुन गंभीर वार करून  त्याच ठिकाणी सोडुन निघुन गेले 

 

फिर्यादी शिवाजी पवार यास त्याच्या नातेवाईक यांनी भगवंत हाँस्पीटल खर्डा येथे उचारासाठी दाखल केले असताना शिवाजी पवार याने दिलेल्या फिर्यादी वरुन खर्डा पोलीस स्टेशन ला गुन्हा रजि नं- ११६/२०२५  भारतीय न्याय संहिता १०९(१),११५(२),३५२,३(५) प्रमाणे फिर्याद दिली आहे. सदर चा गुन्हा दाखल झाले नंतर सहायक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीसांनी घटना ठिकाणी जावुन भेट दिली व आरोपीस तत्काळ शोधुण सदर गंभीर गुन्हा करणारे आरोपी  भाऊसाहेब  परकड व भागवत परकड यांना अटक केली आहे. 

.

पोलीस अधीक्षक  सोमनाथ घार्गे ,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गे,उपविभागीय  पोलीस अधिकारी  गणेश उगले यांच्या मार्गदशनाखाली खर्डा पोस्टे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत, पोलीस अंमलदार संदिप धामने ,संभाजी शेंडे, शशी म्हस्के,,अशोक बडे,गणेश बडे,राहुल शिंदे,धनराज बिराजदार,बाळु खाडे यांनी सदर ची कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here