कोपरगाव/लक्ष्मण वावरे :
कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत ब्राह्मणगाव येथे चौक व गाव अंतर्गत रस्त्यालगत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. यामुळे गावाने प्रगतीच्या दिशेने अजून एक पाऊल टाकले असून ब्राह्मणगाव डिजिटल होऊन चोरी किंवा काही अनुचित प्रकार रोखण्यास नक्कीच मदत होणार असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच अनुराग येवले यांनी दिली.
सरपंच अनुराग येवले ,उप सरपंच यमुनाबाई आसने ,सर्व ग्रामपंचायत चे सदस्य ग्राम अधिकारी विजय पाटील यांच्या संकल्पनेतून अनेक विकास कामे सध्या ब्राह्मणगाव मध्ये सुरू असून ग्रामस्त यांनी समाधान व्यक्त केले आहे
ब्राह्मणगाव येथील गाव अंतर्गत रस्ते ,पूल ,भूमिगत गटारी ,सौचालय ,स्मशान भूमी सुशोभिकरण ,वृक्ष लागवड ,घरकुल योजना असे एक ना अनेक कामे सध्या गावात सुरू असून ब्राह्मणगाव च्या रखडलेल्या विकासात या मुळे भर पडत असल्याचे लोक बोलत आहे
सरपंच अनुराग येवले यांनी सांगितले की उपसरपंच व सर्व सदस्य तसेच जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनखाली गावचा असाच विकास सुरू राहील व पुढील काळात देखील अनेक कामे प्रस्तावित असून ती देखील पूर्ण केली जातील व जनेतने आमच्या वर ठेवलेला विश्वासाला कुठे ही तडा जाऊ देणार नसल्याचे म्हटले आहे.