नांदेड प्रतिनिधी :- गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सूरेखाताई नेरलकर यांचा सत्कार व सन्मान माजी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव व गुरूदेव दत्त मंदिर भजनी मंडळ यांच्या वतीने 11जुलै रोजी करण्यात आला.
आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमा हा गुरुगौरवाचा पवित्र दिवस!! या दिवसाचे औचित्य साधून सिडको, नवीन नांदेड येथील गुरुवार बाजार स्थित गुरुदेव दत्त मंदिरात भाजपा प्रदेश कमिटी महिला मोर्च्या च्या सचिव प्रा.डॉ.ललिता बोकारे (शिंदे ),यांच्या वतीने तसेच गुरूदेव दत्त महिला मंडळाच्या संयुक्त वतीने गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ सामाजिक, धार्मिक कार्यकर्त्यां सुरेखा अरुणराव नेरलकर यांचा साडी चोळी, शाल श्रीफळ देवून यथोचित सत्कार करण्यात आला.
मंदीर समितीच्या अध्यक्षा ललिता बोकारे यांनी आपल्या प्रस्ताविकात आपल्या भारतीय संस्कृतीचे गुरुचें महत्व विषद केले. सत्कार मूर्ती सुरेखा ताई नेरलकर यांनी शालेय बालक, किशोरवयीन मुलांना संस्कारक्षम मूल्य शिक्षण देणे आवश्यक आहे. यासंबधी माहिती दिली. यावेळी भजन, हरिपाठ, रामरक्षा, हरिपाठ यांचे सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा मोर्च्याच्या महिला पदाधिकारी सर्वस्वी ललिता बोकारे, संतोषी भाले, अनिता गज्जेवार, आशादेवी पताळे, अरुणा बंडेवार, सीमा गुंडाळे, अरुणा करडखेले यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.