देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे : राहुरी पोलिसांना अचैध दारु धंदे सापडत नाही. म्हणून दारु विक्रीच्या विरोधात आक्रमक झालेल्या महिलांनी राहुरी फॅक्टरी येथिल प्रसादनगर भागात राजरोसपणे अवैध दारु विक्री सुरु असलेल्या ठिकाणी शुक्रवारी सकाळी संतप्त महिलांनी दारु विक्री करताना एका महिलेस रंगेहाथ पकडून पोलिसांना जे करता येत नाही. ते संतप्त महिलांनी करुन दाखवून पोलिसांची अब्रू जनते समोर उतरवली.घटनास्थळी बीट हवालदार बाबासाहेब शेळके आले असता संतप्त महिलांनी प्रश्नाचा भडीमार केला. याच दरम्यान या घटनेचे छायचित्रण करणाऱ्या जालिंदर अल्हाट या पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेत दमबाजी केली.पत्रकारास दमबाजी करणाऱ्या पोलिसावर पोलिस निरीक्षकांनी कारवाई न केल्यास पत्रकार संघटना आंदोलन छेडणार आहेत.
पोलिसांच्या आशिर्वादाने सुरु असलेल्या राहुरी तालुक्यातील राहुरी फँक्टरी येथिल प्रसादनगर भागातील अवैध दारु विक्री बाबत या भागातील संतप्त महिला आक्रमक झाल्या आहेत.या संदर्भात पोलिस निरीक्षकसंजय ठेंगे यांना निवेदन देवून या भागातील अवैध दारु विक्री बंद करण्याची मागणी केली.या भागातील कमी वयातील तरुण मुले दारुच्या आहरी जाऊन व्यसनाधिन झाले आहेत.याच दारुमुळे कमी वयातील अनेक तरुण मुले मयत झाले.यापूढील काळात दारुमुळे कोणी मृत्यूमूखी पडला तर त्याची सर्व जबाबदारी राहुरी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यावर राहिल.व त्याचा अंत्यविधी राहुरी पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांच्या दालना समोर केला जाईल.असा संतप्त इशारा राहुरी फँक्टरी येथिल प्रसादनगर भागातील संतप्त महिलांनी दिला होता.
मागिल आठवड्यात राहुरी पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचारी राहुरी फँक्टरी येथिल अवैध दारु गुत्यावर छापा मारण्यासाठी पोहचतात.परंतू त्यापूर्वी पोलिस व झीरो पोलिसाने अवैध दारुगुत्ते बंद ठेवण्यास सांंगून निवेदन देणाऱ्या महिलांना तोंडघशी पाडण्यात आले.महिलांच्या तक्रारीवरुन छापा मारला परंतू येथे दारु विक्रीच होत नसल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिला होता.पोलिसांना दारु सापडत नसल्याने संतप्त महिलांनी दारु धंद्यावर छापा मारुन दारु धंदे पकडून द्यायचा निर्धार केला होता.त्या नुसार संतप्त महिलांनी शुक्रवारी सकाळी दारु विक्री करणाऱ्या सुगंधाबाई प्रेमा पवार या महिलेस रंगेहाथ पकडून राहुरी पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी बिट हवलदार बाबासाहेब शेळके व त्यांचा एक सहकारी दाखल झाले असता संतप्त महिलांनी पोलिसांवर आग पाखड केली.
दरम्यान घटनास्थळी पत्रकार जालिंदर अल्हाट हे छायचित्रण करीत असताना बिट हवलदार बाबासाहेब शेळके यांनी मोबाईल हिसकावून घेत येथे छायचित्रण करायचे नाही. तुमच्या मुळे या महिला पोलिसांना आव्हाण देत आहे.असे म्हणून पोलिसाने पत्रकारास दमबाजी करण्यास सुरवात केली.मोबाईल फोडण्याची धमकी दिली. संतप्त महिलांनी पत्रकाराचा मोबाईल मागे द्या नाही तर तुम्हाला येथून जावू देणार नाही असा इशारा देताच पो.हे.काँ.शेळके यांनी मोबाईल मागे देवून घटनास्थळावरुन काढता पाय घेतला.
यावेळी शरद साळवे, लैला शेख, परवीन शेख, रेखा जाधव, सुनिता पवार, रुथ कांबळे, मंगल थोरात, सविता बनसोडे, रोशन शेख, स्वार्थाबाई जाधव, जैतून भाभी, माया साठे, लता जगताप, अलका पठारे, लता साळवे, येलनबाई गायकवाड, परिगा सरोदे, अंजू बोर्डे, पल्लवी पवार, रंगूबाई मोकळ, लक्ष्मीबाई पंडित, कविता साळवे आदि महिला उपस्थित होत्या.