मूत्रपिंड…..किडनी /मुतखडे

0

मूत्रपिंड दोन मुठ आकाराचे, चवळीसारख्या द्वीदल धान्य प्रमाणे दिसते. मूत्रपिंड म्हणजेच किडनी, मूत्र तयार करण्यासाठी आपल्या रक्तातील अशुद्धी आणि अनावश्यक पाणी फिल्टर करते. मूत्रपिंड रक्तातील अशुद्धी फिल्टर करण्यास अक्षम असल्यास मूत्रपिंडाचा रोग होतो. काय होतं , ही अशुद्धी मूत्रपिंडाच्या आत एका ठिकाणी एकत्र चिकटून राहते आणि दगडासारखा घन वस्तुमान असलेला खडा तयार होतो. यामुळे मूत्रमार्गावर परिणाम होतो. ह्यालाच आपण मुतखडा म्हणतो.

मुतखड्याची लक्षणे कोणती…?

*लघवीतून रक्त पडणे.

*लघवी करताना वेदना होते.

*लघवी गडद दिसते.

*लघवीला नेहमीपेक्षा वेगळा वास येतो.

*नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवी होते.

*लघवी करताना आग होते.

*लघवीचा रंग गुलाबी किंवा लाल रंग असू शकतो.

*कधीकधी लघवीतील रक्त केवळ सूक्ष्म तपासणीद्वारेच शोधले जाऊ शकते, ते दिसत नाही पण जळजळ होते.

रेत…
जरी लहान खड्यामुळे वेदना होत नाही किंवा लक्षणे नसली तरी ते लघवीत असतातच.

*लघवी करताना अत्यंत वेदना: हे मुतखड्याचे सर्वात महत्वाचे लक्षण आहेआणि खडा मूत्रवाहिनीच्या खाली सरकतो तेव्हा ते जास्त जाणवते.

खूप पाणी प्या, जल हेच अमृत मानले गेले आहे. पाणी हे हाइड्रेशनचा स्तर संतुलित राखण्यास मदत करते. पाणी हे पचन आणि अवशोषण क्रिया अधिक जलद गतीने होण्यास मदत करते. पाणी शरीरातून अनावश्यक विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकण्यास मदत करते. जर हे पदार्थ असेच आत राहिले, तर त्यामुळे किडनीला अधिक जास्त नुकसान होऊ शकते. ज्या लोकांना मूतखडा झाला आहे त्यांचा मूतखडा मुत्र विसर्जनामधूनच बाहेर निघावा यासाठी त्यांना दिवसातून 7-8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

डाळींबाचा रस…
नॅशनल किडनी फाउंडेशनच्या अनुसार, डाळिंब हे पोषक तत्वांनी भरपूर भरलेले असते. डाळींबाचा रस हा सर्वात चांगल्या अशा नैसर्गिक पेयांपैकी एक आहे जे शरीराला हायड्रेटेड राखण्यास मदत करतात. मूतखडा दूर करण्यास डाळींबाचा रस खुप प्रभावी ठरू शकतो हे अनेक जाणकारांनी सांगितलेले आहे. यात चांगले अँटीऑक्सिडेंट असतात जे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतात.

कॉर्न हेअक किंवा कॉर्न सिल्क…
मक्याचे केस किंवा मक्याच्या कणसावर असलेले रेशमी धागे, मक्याच्या भुसामध्ये आढळतात आणि ते सहसा फेकून दिले जातात. पण तुम्हाला माहित आहे का की हे किडनी स्टोन शरीरातून काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी आहेत. मक्याचे केस पाण्यात उकळून ते पाणी गाळून पिऊ शकतो. हे नवीन मुतखडे किंवा किडनी स्टोन्स तयार होण्यास सुद्धा अडथळा निर्माण करतात आणि हा उपाय लघवीचे प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा औषधी ठरतो. ज्यामुळे लघवीचा प्रवाह वाढतो. हे कणसावरील केस किडनी स्टोनशी संबंधित वेदना कमी करण्यास सुद्धा मदत करतात.

मूत्रपिंड…..

दोन मुठ आकाराचे, चवळीसारख्या द्वीदल धान्य प्रमाणे दिसते. मूत्रपिंड म्हणजेच किडनी, मूत्र तयार करण्यासाठी आपल्या रक्तातील अशुद्धी आणि अनावश्यक पाणी फिल्टर करते. मूत्रपिंड रक्तातील अशुद्धी फिल्टर करण्यास अक्षम असल्यास मूत्रपिंडाचा रोग होतो. काय होतं , ही अशुद्धी मूत्रपिंडाच्या आत एका ठिकाणी एकत्र चिकटून राहते आणि दगडासारखा घन वस्तुमान असलेला खडा तयार होतो. यामुळे मूत्रमार्गावर परिणाम होतो. ह्यालाच आपण मुतखडा म्हणतो.

मुतखड्याची लक्षणे कोणती…?

*लघवीतून रक्त पडणे.

*लघवी करताना वेदना होते.

*लघवी गडद दिसते.

*लघवीला नेहमीपेक्षा वेगळा वास येतो.

*नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवी होते.

*लघवी करताना आग होते.

*लघवीचा रंग गुलाबी किंवा लाल रंग असू शकतो.

*कधीकधी लघवीतील रक्त केवळ सूक्ष्म तपासणीद्वारेच शोधले जाऊ शकते, ते दिसत नाही पण जळजळ होते.

रेत…
जरी लहान खड्यामुळे वेदना होत नाही किंवा लक्षणे नसली तरी ते लघवीत असतातच.

*लघवी करताना अत्यंत वेदना: हे मुतखड्याचे सर्वात महत्वाचे लक्षण आहेआणि खडा मूत्रवाहिनीच्या खाली सरकतो तेव्हा ते जास्त जाणवते.

खूप पाणी प्या, जल हेच अमृत मानले गेले आहे. पाणी हे हाइड्रेशनचा स्तर संतुलित राखण्यास मदत करते. पाणी हे पचन आणि अवशोषण क्रिया अधिक जलद गतीने होण्यास मदत करते. पाणी शरीरातून अनावश्यक विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकण्यास मदत करते. जर हे पदार्थ असेच आत राहिले, तर त्यामुळे किडनीला अधिक जास्त नुकसान होऊ शकते. ज्या लोकांना मूतखडा झाला आहे त्यांचा मूतखडा मुत्र विसर्जनामधूनच बाहेर निघावा यासाठी त्यांना दिवसातून 7-8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

डाळींबाचा रस…
नॅशनल किडनी फाउंडेशनच्या अनुसार, डाळिंब हे पोषक तत्वांनी भरपूर भरलेले असते. डाळींबाचा रस हा सर्वात चांगल्या अशा नैसर्गिक पेयांपैकी एक आहे जे शरीराला हायड्रेटेड राखण्यास मदत करतात. मूतखडा दूर करण्यास डाळींबाचा रस खुप प्रभावी ठरू शकतो हे अनेक जाणकारांनी सांगितलेले आहे. यात चांगले अँटीऑक्सिडेंट असतात जे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतात.

कॉर्न हेअक किंवा कॉर्न सिल्क…
मक्याचे केस किंवा मक्याच्या कणसावर असलेले रेशमी धागे, मक्याच्या भुसामध्ये आढळतात आणि ते सहसा फेकून दिले जातात. पण तुम्हाला माहित आहे का की हे किडनी स्टोन शरीरातून काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी आहेत. मक्याचे केस पाण्यात उकळून ते पाणी गाळून पिऊ शकतो. हे नवीन मुतखडे किंवा किडनी स्टोन्स तयार होण्यास सुद्धा अडथळा निर्माण करतात आणि हा उपाय लघवीचे प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा औषधी ठरतो. ज्यामुळे लघवीचा प्रवाह वाढतो. हे कणसावरील केस किडनी स्टोनशी संबंधित वेदना कमी करण्यास सुद्धा मदत करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here