कोपरगाव प्रतिनिधी
_________________
जागतिक स्तनपान सप्ताह हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडयात म्हणजेच १ ते ७ ऑगस्ट या दरम्यान साजरा केला जातो दरवर्षि यासाठी एक विषय दिला जातो. या विषयाला अनुसरून हा सप्ताह साजरा केला जातो. यावर्षिचा विषय होता, “चला स्तनपान करूया आणि काम करुया, काम करुया.आजच्या धावपळीच्या जीवनात आपण पाहतो की, खुप महिला या जॉब करत आहेत. मग अशा महिला जेव्हा गर्भवती असता किंवा प्रसुती नंतरही या महिलांसाठी कामाच्या ठिकाणी खुप सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात, त्याचा प्रसार करण्यासाठी या वर्षीची थीम किंवा विषय महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारा होता.
याचेच औचित्य साधित राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनच्या नर्सिग कॉलेज व राष्ट्रसंत जनार्धन स्वामी नर्सिग कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना या यूनिट ने कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात एक कार्यक्रम साजरा केला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एक नाटिका सादर करत जन जागृती केली. व स्तनपानाचे फायदे व स्तनपान करवयाच्या स्थिती याबद्दल माहिती दिली. तसेच रुग्णालयाला भेट देणाऱ्या गर्भवती महिलासाठी गुळ शेंगदाणा लाडुचे वाटप देखील केले..कार्यक्रमासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सचिन जाधव, वैदयकीय अधिकारी डॉ. उंबरकर,स्त्री रोगतज्ञ डॉ. लाडे,रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.तसेच ग्रामीण भागातील गरोदर माता तसेच प्रसुती नंतरच्या माता याचीही मोलाची उपस्थिती लाभली. कार्यक्रमासाठी सतत, उत्सुकपणे सहकार्य करणारे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनचे संस्थापक चांगदेव कातकडे,सचिव प्रसाद कातकडे व नर्सिंग कॉलजचे प्राचार्य डॉ.इरशाद अली यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. तसेच नर्सिंग कॉलेज च्या अध्यापिका रेश्मा पठान यांनीही अथक परिश्रम घेतले