पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम :
पुसेगाव तालुका खटाव पुसेगाव पोलीस स्टेशन मध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे असून मंगळवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुसेगाव पोलीस स्टेशन मध्ये आयोजन केले आहे. पुसेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील व परिसर पंचक्रोशीतील सुजाण नागरिकांनी या रक्तदाना शिबिरात सहभागी राहावे व रक्तदान करणारा प्रत्येक व्यक्तीस एक आकर्षक भेटवस्तू पोलीस स्टेशन मार्फत दिली जाणार आहे. व पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी या रक्तदानात युवक ,महिला, आदी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे.