मुतखडा
- मुतखडयांवर आयुर्वेदात अनेक औषधे सांगितली आहेत. मुतखडयांचा त्रास असल्यास एकदा तरी तज्ज्ञाकडून योग्य ती तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ताबडतोब शस्त्रक्रिया करणे आवश्यक नसल्यास निरनिराळे आयुर्वेदिक उपाय करून पाहता येतील. वरुणादि काथ हे औषध यासाठी उपयुक्त आहे. हे औषध सकाळ सायंकाळ 2-2चमचे घ्यावे.-
- मुतखडयांचा उपचार आणि प्रतिबंध या दोन्ही दृष्टींनी भरपूर पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे व शक्यतो विहिरी व बोअरचे (क्षारयुक्त) पाणी पिणे टाळावे.
- मुतखडयांवर आयुर्वेदात अनेक औषधे सांगितली आहेत. मुतखडयांचा त्रास असल्यास एकदा तरी तज्ज्ञाकडून योग्य ती तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ताबडतोब शस्त्रक्रिया करणे आवश्यक नसल्यास निरनिराळे आयुर्वेदिक उपाय करून पाहता येतील. वरुणादि काथ हे औषध यासाठी उपयुक्त आहे. हे औषध सकाळ सायंकाळ 2-2चमचे घ्यावे.
- कडुलिम्बाच्या पानाची राख २ ग्राम पाण्याबरोबर नियमित खाल्याने मुतखडा विरघळून जातो.
- जर खडा लहान असेल आणि जास्त जुना नसेल तर मेहंदी चे साल वाटून चूर्ण करावे आणि सकाळी अर्धा चमचा नियमित घेतल्याने मुत्खावा विरघळतो.
- पुनर्नवा वनस्पतीही मुतखडयावर उपयुक्तआहे. पुनर्नवा (खापरखुटी, वसूची भाजी) ही पावसाळयापासून होळीपर्यंत ठिकठिकाणी आढळते. या वनस्पतीची मुळासकट बिनतिखट चटणी (50 ग्रॅम) रोज जेवणात असावी. ओली वनस्पती काढून सावलीत वाळवून नंतर वापरता येते.
- या उपायांबरोबरच टोमॅटो, कोबी, अळू,, इत्यादी भाज्या जेवणातून वर्ज्य कराव्यात.
- पाषाणभेद वनस्पती व गोखरू काटे (सराटे) यांचे समप्रमाणात मिसळलेले चूर्ण दोन ग्रॅम, रोज एक वेळ (सकाळी रिकाम्या पोटी) पाण्याबरोबर द्यावे. त्यानंतर चार-पाच तास तोंडाने काहीही न घेण्याची सूचना द्यावी. याप्रमाणे दीड महिना रोज उपचार करावेत. पाच-सहा महिन्यांनंतर परत एकदा महिनाभर हाच उपाय करावा. हा उपाय लागू पडल्यास लघवीतून खडयाची खर बाहेर पडताना जाणवते. औषध चालू केल्यानंतर आठ-दहा दिवसांत हा परिणाम दिसणे अपेक्षित आहे.
- याचबरोबर कुळीथाचा काढा (25 ग्रॅम कुळीथ + 200 मि.ली. पाणी मंद आचेअर उकळून 50 मि.ली द्रव तयार करणे) रोज द्यावा. असे तीन ते सात दिवस देऊन तीन-चार आठवडे थांबून परत 3 ते 7 दिवस हाच उपाय करावा.