आई-वडिलांनंतर शिक्षकांची भूमिका महत्त्वाची… जावळे
कोपरगाव( वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने सोनेवाडी ग्रामस्थांनी सन्मान केला. पारंपरिक डफडे व पिपाणी वाद्याच्या गजरात गावामध्ये रथाचा आकार असलेल्या फोर व्हीलर गाडीतून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी केलेल्या सन्मानामुळे शिक्षक भारावुन गेले. आई-वडिलांनंतर विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम खऱ्या अर्थाने शिक्षक करतात त्यामुळे त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते त्यांचा आदर करणे ही सर्वांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन सोनेवाडी विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष विश्वनाथ जावळे यांनी केले.ते काल शिक्षकांच्या गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी ग्रामपंचायतीचे मार्गदर्शन निरंजन गुडघे, उपसरपंच संजय गुडघे, ग्रामविकास अधिकारी भानुदास दाभाडे, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष धर्म जावळे, अध्यक्ष राजेंद्र गुडघे, उपाध्यक्ष आनाजी जावळे, ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब जावळे, चिलु जावळे, अशोक घोडेराव, भाऊसाहेब खरे, गोपीनाथ जावळे, तुकाराम जावळे, द्वारकानाथ चव्हाण, मच्छिंद्र गुडघे, पुंजाहरी आव्हाड, सिताराम गांगुर्डे, शाळेचे मुख्याध्यापक महिंद्र रहाणे, शिक्षक विलास गवळी, चंद्रविलास गव्हाणे, कांचन मोकळ, सुरेश धनगर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण जावळे, उपाध्यक्ष सोमनाथ रायभान, सदस्य योगेश जावळे, राजेंद्र सोदक, सुनील जावळे अदी सह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाल श्रीफळ व डोक्यावर फेटा बांधत सर्व शिक्षकांचा ग्रामस्थांनी हनुमान मंदिरात सत्कार केला.यावेळी ग्रामसेवक भानुदास दाभाडे यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात असणारे नाते विषद करताना सांगितले की अभ्यासावर आधारित विद्यार्थ्यांची प्रगती व समाजातील विविध जनरल नॉलेजवर शिक्षक प्रकाशझोत टाकत असतात. त्यामुळे शिक्षकांचे अनन्य साधारण महत्व आहे.तर सत्काराला उत्तर देताना शिक्षकांनी ग्रामस्थांनी केलेला शिक्षकदिनाच्या दिवशी सन्मान आमच्यासाठी खूप मोठा गौरव अजून आमची खऱ्या अर्थाने यातून जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले. गाव शाळेत येण्यापेक्षा शाळा गावात कशी येईल याकडे आम्ही जास्त प्रमाणात लक्ष देऊ.विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्तेबरोबर सर्वांगीण विकास हेच आमचे यापुढे ध्येय असणार असल्याचेही मुख्याध्यापक महेंद्र रहाणे, विलास गवळी व चंद्रविलास गव्हाणे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आभार लक्ष्मण जावळे यांनी मानले.