कोपरगाव प्रतिनिधी : 5 सप्टेंबर हा भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशांमध्ये साजरा केला जातो. या दिवशी शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ येथे विविध प्रकारचे उपक्रम साजरे केले जातात. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्कर वस्ती येथे देखील हा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता दुसरी ते पाचवीच्या वर्गातील काही विद्यार्थी हे शिक्षक शिक्षिका बनुन आज दिवसभर शाळेचे कामकाज त्यांनी पाहिले. अद्वैत भास्कर मुख्याध्यापक म्हणून यांनी काम बघितले तर आराध्या रोहोम हिने उपमुख्याध्यापक म्हणून काम बघितले. आज सर्व विद्यार्थ्यांना नवीन अनुभव अनुभवास मिळाला. शाळेच्या वतीने या चिमुकल्या शिक्षकांचे पेन देऊन त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जयंत मोरे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कामी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ ज्योती टोरपे यांनी कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन केले होते. शाळेचे उपशिक्षक सुकलाल महाजन सर यांनी प्रास्ताविक केले तर शाळेचे उपाध्यापक महेंद्र विधाते यांनी सर्वांचे आभार मानले.