नगर – भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहमतीने व आदेशानुसार भाजपचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी नगर दक्षिण दिव्यांग सेलच्या अध्यक्षपदी प्रा.वसंत शिंदे यांची नियुक्ती केली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या दिव्यांगसाठी वेगवेगळ्या शासकीय सावलती, साहित्य, वेगवेगळ्या योजना गोरगरीब जनतेला देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांनी दिव्यांगांना जगण्याची एक नवीन उमेद निर्माण करून दिली आहे. नगर जिल्ह्यातील दिव्यांग बंधू व भगिनीं यांच्या करत असलेल्या सेवेमुळे माझी दुसर्यांदा निवड करण्यात आली आहे. या पदाच्या माध्यमातून तळागाळातील गोरगरीब लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचवण्यासाठी गावागावत दिव्यांगचे सर्वेक्षण करणारं असून लवकरच जिल्यातील पदाधिकारी यांच्या निवडी करून जबाबदारी सोपवण्यात येईल, असे निवडीनंतर प्रा.वसंत शिंदे यांनी सांगितले.
प्रा.वसंत शिंदे हे संजय गांधी निराधार योजनेचे तालुका सदस्य असून, या माध्यमातून गोर-गरिब दिव्यांगांची पेन्शन घराघरापर्यंत पोहचवित आहेत. त्याचप्रमाणे भाजपा जिल्हाध्यक्षपदाच्या मागील कारकिर्दीतील चांगल्या कामांमुळे त्यांची दुसर्यांदा दिव्यांग सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आ.राम शिंदे, खा.डॉ.सुजय विखे, माजी मंत्री तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, आ.मोनिकाताई राजळे, आ.बबनराव पाचपुते, अरुण मुंडे, प्रा.भानुदास बेरड, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षयदादा कर्डिले आदिंसह जिल्ह्यातील दिव्यांग बंधू-भगिनींनी अभिनंदन केले आहे.